सोलापुरात 'वंचित'च उधळणार विजयाचा गुलाल 

तात्या लांडगे
बुधवार, 22 मे 2019

असे मिळेल मताधिक्‍य... 
दलित समाज : दोन लाख 
धनगर समाज : 52 हजार 
मुस्लिम समाज : 76 हजार 
पद्मशाली अन्‌ अन्य वंचित घटक : 78 हजार 
एकूण मते : 4.06 लाख 

सोलापूर : राजकीय विश्‍लेषकांचा आणि माध्यमांच्या एक्‍झिट पोलचा अंदाज खोटा ठरविणारा सोलापूर लोकसभेचा निकाल लागेल. मतदारसंघातील दलित समाजाचे एकगठ्ठा मतदान, धनगर समाजाची साथ अन्‌ मुस्लिम बांधवांसह पद्मशाली व अन्य वंचित समाज घटकांच्या मतांच्या बळावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा किमान 20 ते 25 हजारांच्या मताधिक्‍याने विजय होईल, असा विश्‍वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी व्यक्‍त केला. 

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय व त्यांच्या हक्‍काची जाणीव करण्याच्या उद्देशाने ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने एन्ट्री केली. त्यामुळे सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची झोपच उडाली. सुरवातीला सोपी वाटणारी निवडणूक ऍड. आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना कठीण गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र नवा चेहरा, विकासाची आशा, समाजाचे प्रश्‍न सुटतील याची खात्री वंचित घटकांना वाटल्याने त्यांनी ऍड. आंबेडकरांना साथ दिली. सोलापूर शहर असो की ग्रामीण भाग, या ठिकाणी त्यांना भाजप व कॉंग्रेस उमेदवारांच्या तुलनेत बरोबरीची मते मिळतील. दरम्यान, दलित समाजाच्या पडलेल्या एकगठ्ठा मतांच्या बळावर वंचित बहुजन आघाडीच गुलाल उधळेल, असेही डॉ. माशाळकर यांनी सांगितले. 

असे मिळेल मताधिक्‍य... 
दलित समाज : दोन लाख 
धनगर समाज : 52 हजार 
मुस्लिम समाज : 76 हजार 
पद्मशाली अन्‌ अन्य वंचित घटक : 78 हजार 
एकूण मते : 4.06 लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi claims win in Solapur Loksabha constituency