'वंचित'ला बसणार धक्का; गोपीचंद पडळकर पुन्हा बदलणार पक्ष 

तात्या लांडगे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सांगोल्यातून विजयाची खात्री 
सर्वाधिक धनगर समाज असलेला जिल्हा म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. त्यातच जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची मदत, धनगर समाजासह अन्य समाजातील तरुणांमध्ये पडळकर यांची क्रेझ आहे. यामुळे आमदारकिची संधी निश्चीत मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन सांगली लोकसभा निवडणुकीत सुमारे  तीन लाख मते घेतली होती. मात्र, वंचित बहुजन आघाडीतून आमदार होण्याची संधी मिळणार नाही याची जाणीव झाल्यानेच ते आता शेकापच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करणार असून तेथील धनगर समाजासह अन्य जाती- जमतीमधील कार्यकर्ते, नेत्यांचा आग्रह असल्याचे पडळकर यांनी सकाळ शी बोलताना सांगितले. मात्र, वंचित बहुजन आघाडी की शेकाप मधून लढणार हे निश्चीत नसल्याचे ते म्हणाले. जेष्ठ आमदार आणि धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगोल्यातून विजयाची खात्री 
सर्वाधिक धनगर समाज असलेला जिल्हा म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. त्यातच जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांची मदत, धनगर समाजासह अन्य समाजातील तरुणांमध्ये पडळकर यांची क्रेझ आहे. यामुळे आमदारकिची संधी निश्चीत मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Bahujan Aghadi leader Gopichand Padalkar may be entered Shetkari Kamgar paksha