निकृष्ट फिडरमुळे वारणवाडीकरांनाचा ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पारनेर : वारणवाडी येथील सबस्टेशनच्या मांडवे खुर्द फिडरचे काम अतिशय निकृष्ट प्रकारचे झाले असून त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पारनेर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केले.

या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारणवाडी येथील सबस्टेशनच्या मांडवे खुर्दकडे जाणाऱ्या फिडरचे काही खांब खाली पडले असून काही वाकले आहेत. हे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. त्यामुळे हे काम त्वरीत करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मांडवे खुर्द कडे जाणारे सर्व पोल पुन्हा उभे करुन वीज वितरण आठ दिवसात सुरु करावे . 

निवेदनावर पांडुरंग गागरे, यशवंत जाघव, भाउसाहेब गागरे, बाळासाबेब हारदे, गोरख मिंडे, नामदेव गागरे, संतोष गागरे, रामदास आहेर, संपत गागरे, बाळु गागरे, विकास गागरे, श्रीरंग गागरे, संपत गागरे, विनायक जाधव, बाजीराव गागरे, देवराम हारदे, शरद जाधव, सुर्यभान गागरे, बाळु गागरे, भाउसाहेब गागरे आदिंच्या सह्या आहेत. 

Web Title: varanwadi people agitation against maharashtra state electricity board