
पोलिस आयुक्तालयात कार्यक्रम
पोलिस आयुक्तालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी शहीद अधिकाऱ्यांना अभिवादन केले. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध संघटनांच्या वतीनेही शहीद दिनानिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम आयोजिण्यात आले.
सोलापूर ः संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी महापालिकेत दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधानाचे नगरसेवकांसमवेत वाचन केले.
महापालिकेत कार्यक्रम
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे थोर सुपुत्र व सोलापूरचे माजी पोलिस आयुक्त अशोक कामटे मुंबईतील एटीएस पथकाचे प्रमुख पोलिस अधिकारी हेमंत करकरे, चकमकफेम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर, सोलापुरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 चे जवान राहुल शिंदे, एनएसजी मधील मेजर संदीप उन्नीकृष्णन हे शहीद झाले होते. त्यांचे आदर्श व त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी दर वर्षी 26 नोव्हेंबरला शहीद दिन साजरा करण्यात येतो.
दक्षिण सोलापूर पंचायत समिती
दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीने सभापती सोनाली कडते यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी संविधान प्रस्ताविकेचे प्रतिज्ञा स्वरूपात वाचन करण्यात आले. यानिमित्ताने संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या फलकाचेही अनावरण सभापती कडते यांच्या हस्ते झाले. या वेळी गटविकास अधिकारी राहुल देसाई, सहायक गटविकास अधिकारी रंजना कांबळे, पंचायत समिती सदस्य श्रीशैल्य नरोळे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, माजी कृषी सभापती भीमाशंकर जमादार, बाळासाहेब शेळके उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर माने-देशमुख यांनी आभार मानले. या वेळी यशवंत गवळी, सुधीर ढाकणे, डॉ. अश्विन करजखेडे, सुनीता लांबतुरे उपस्थित होते.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषदेमधील संविधान लेखा ठिकाणी पुष्पार्पण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कार्याध्यक्ष पी. जे. राऊत, श्रीशैल देशमुख, शशी नडगिरे, राजेश देशपांडे, लीला पुजारी, डॉ. अनुराधा सोनकांबळे, बसवेश्वर स्वामी, दिनेश नन्हा, त्रिमूर्ती राऊत, संजय कांबळे, शरद वाघमारे, प्राणेश ओहळ, धनंजय राठोड, कदीर सय्यद, हरी देशमुख, राजीव गाडेकर, श्रीधर कलशेट्टी उपस्थित होते.
वडाळ्यात संविधान दिन
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील भीमनगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या वतीने उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. गटविकास अधिकारी समाधान नागणे यांनी मूलभूत कर्तव्य सांगितले. या वेळी दिनेश साठे, जीवन साठे, बाबासाहेब गायकवाड, नागेश तिकुठे, सतीश गायकवाड, अंकुश कसबे, नानासाहेब गायकवाड, शेखर गायकवाड, राहुल तिकुठे, संजय सरवदे, समाधान गायकवाड, अमोल गायकवाड, राजेंद्र कटरमल, हर्षल गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, सोमनाथ कटरमल, कैलास लामकाने, अंकुश कसबे, आकाश काळे, सागर फंड, किरण वाघमारे, आदर्श गायकवाड उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत 70 जणांचे रक्तदान
संविधान दिन व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी 70 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी संविधानाची शपथ दिली. शासकीय काम करत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याने सामाजिक बांधिलकी दाखवून दिल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रशासनाधिकारी आरिफ सय्यद, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, शशी नरगडे, नागेश पाटील उपस्थित होते.
हेही पहा... महापालिकेत अभिवादन आणि 26 नोव्हेंबर 2017 तील घटनाक्रम (व्हिडीओ)