नारळाच्या शेंडीपासून साकारल्या विविध वस्तू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

कोल्हापूर - नारळाची शेंडी म्हटलं तर टाकाऊ पण तिचा टिकाऊ म्हणून उपयोग झाला तर किती अप्रतिम कलाकृती तयार होऊ शकतात, याची प्रचिती मधुरांगण सभासदांनी अनुभवली. निमित्त होते ‘सकाळ’ मधुरांगण आयोजित नारळाच्या शेंडीपासून विविध वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळेचे. शाळकरी मुलींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाजी उद्यमनगर येथील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात दोन बॅचेसमध्ये ही कार्यशाळा झाली. 

केवळ नारळाची शेंडी, कात्री आणि दोरा या सामानाच्या साहाय्याने थोडेसे कौशल्य वापरून विविध वस्तू शिकण्याची आणि प्रत्यक्ष करण्याची संधी या निमित्ताने महिलांना उपलब्ध झाली. दैंनदिन वापरामध्ये बऱ्याचदा नारळ फोडून त्याची शेंडी फेकूनच दिली जाते; मात्र याच शेंडीचा वापर करून अंग घासण्याच्या स्क्रबरपासून पक्ष्यांच्या घरट्यापर्यंत बऱ्याच उपयोगी आणि शोभेच्या वस्तू बनविता येतात. निरनिराळ्या प्रकारची आणि आकाराची फुले, नारळाचे झाड, सुगरण पक्ष्याचे घरटे, कासव यासोबत अनेक नावीन्यपूर्ण वस्तू महिलांना शिकता आल्या. परमेकर कॉयर हाऊसच्या मेघा परमेकर यांनी याचे प्रशिक्षण दिले. केरळ शासनाकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले असून, त्यांच्या हजारांहून अधिक प्रशिक्षण कार्यशाळा झाल्या आहेत. ‘सकाळ’च्या व्यवस्थापक (प्रशासन) साधना दुधगावकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. कार्यशाळेसाठी वीणा भोसले व पूजा कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: Various objects fall from coconut reassured