वसंतदादा कारखान्याचा निर्णय सूडबुद्धीने नाही  - दिलीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना सुरू राहिला पाहिजे, ही बॅंकेची अन्‌ आमची भूमिका आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील हुशार आहेत. भविष्यात हेच विशाल पाटील कारखान्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाईचा कांगावा करतील, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

ते म्हणाले,""शासन नियमानुसार जिल्हा बॅंक, कामगार, शेतकरी, सरकारी देणी नियमानुसार हिश्‍श्‍याप्रमाणे दिली जातील.'' 

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना सुरू राहिला पाहिजे, ही बॅंकेची अन्‌ आमची भूमिका आहे. कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील हुशार आहेत. भविष्यात हेच विशाल पाटील कारखान्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाईचा कांगावा करतील, असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. 

ते म्हणाले,""शासन नियमानुसार जिल्हा बॅंक, कामगार, शेतकरी, सरकारी देणी नियमानुसार हिश्‍श्‍याप्रमाणे दिली जातील.'' 

वसंतदादा साखर कामगार भवनात कामगार नेते आर. बी. शिंदे यांच्या स्मृतिदिनी कामगार मेळाव्यात ते बोलत होते. खासदार संजय पाटील प्रमुख पाहुणे होते. अध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार दिनकर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. वसंतदादा शेतकरी कारखान्याच्या 93 कोटी कर्जाच्या वसुलीसाठी सांगली जिल्हा बॅंकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. कारखाना भाडेपट्टयाने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा काढली आहे. 

श्री. पाटील म्हणाले,""वसंतदादा कारखाना भाडेपट्टयाने चालवण्यास देण्यासाठीचा विशाल पाटील यांचा आग्रह बॅंक संचालकांनी मान्य केला आहे. आम्ही धाडसानं हा कारखाना चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. अन्यथा जिल्हा बॅंकेची 50 कोटींची देणी कारखान्यांची विक्री करूनही मिळवू शकलो असतो. मात्र वसंतदादांनी स्थापन केलेला कारखान्याबद्दल मला नव्हे सर्वांनाच आदर्श आहे. बॅंक कारखाना भाडेतत्त्वाने देणार आहे म्हणून कामगार किंवा देणेकऱ्यांनी एकाच वेळी पैसे मागितले तर परिस्थिती अवघड बनेल. कामगार समजूतदार आहेत.'' 

ते म्हणाले,""सहकार मंत्र्यांनीही कारखाना चाललाच पाहिजे हे स्पष्ट केले आहे. कारखाना चालवण्यास देण्यापूर्वी बॅंक शेतकरी संघटनेसह सर्वांशी चर्चेची तयारी आहे. काळजी करू नका. सर्वांचे पैसे मिळतील, मात्र गैरसमज पसरवू नका. कारखाना भाडेपट्टयाने देणारी आमची भूमिका पारदर्शी राहील.'' 

विशाल पाटील म्हणाले,""आर्थिक परिस्थिती गंभीर असताना कारखाना दोन वर्षे चालवला. मात्र शेतकऱ्यांनी यंदा पर्याय शोधला. कामगारांना पर्याय नसल्याने काही करू शकत नाहीत. त्यामुळेच यंदा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

बॅंकेचे अध्यक्ष श्री. पाटील, खासदार पाटील, विशाल पाटील, ऍड. के. डी. शिंदे, कामगार नेते तात्यासाहेब काळे यांनी आर. बी. शिंदे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कारखाना चालू ठेवून कामगारांचे प्रश्‍न सोडवा, हीच त्यांची भूमिका कायम असल्याचे कामगार नेत्यांनी स्पष्ट केले. निवृत्त कामगार, त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार झाला. प्रदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. 

आताचं प्रेम कुठनं आलं - दिलीपतात्या... 

विशाल पाटील यांनी भाषणात कारखाना चालवण्याबाबत पाहुण्यांकडून अपेक्षा करणे गैर नाही, असे मत व्यक्त केले. त्यावर चिमटा काढताना बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले,""दोन वर्षांपूर्वी माझ्या हस्ते कारखाना सुरू केला. सात लाख टन गाळप झाले. यंदा दुसऱ्यांच्या हस्ते सुरवात झाली अन्‌ कारखाना बंद पडला. 40 वर्षे मी सहकारात काम करतोय, आजच मला का बोलावले हे मी ओळखले आहे. आताच प्रेम कुठनं आलं. विशाल व खासदार पाटील पाहुणे जरूर आहेत. मात्र पक्षीय राजकारणात काहीही होऊ शकते. आज कारखाना चालवायला द्या म्हणणारे उद्या सूडबुद्धीने कारखान्यावर कारवाईचा बाऊ करतील.'' 

विशाल कॉंग्रेसमध्ये आहेत ? 

खासदार संजय पाटील म्हणाले,""कारखान्याचे कामगार उपाशी पोटी तत्त्वज्ञान ऐकू शकत नाहीत. पण कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. कारखाना चालू ठेऊन कामगार, शेतकऱ्यांची देणी दिली जातील. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहे. विशाल पाटील तुम्ही कॉंग्रेसमध्ये आहात ना? असा खोचक सवाल उपस्थित केला. राजकीय मतभेद विसरून कामगारांच्या रोजीरोटीसाठी तरी कारखाना समन्वयाने चालवा, असा सल्ला दिला. 

Web Title: Vasantdada sugar factory issue