वटवृक्षाचे रोपण करुन वटपोर्णिमा साजरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

उंडाळे (सातारा) - येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरित सेनेच्या विद्यार्थांनी वटपोर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे रोपण करून वटपोर्णिमेचा सण अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावेळी पोलीस हवालदार श्री. पानवळ, प्राचार्य कुमार आडके, पर्यवेक्षक बी.आर.पाटील, हरित सेना समन्वयक जगन्नाथ माळी, या वेळी सर्व शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पोलीस स्टेशनच्या आवारात वटवृक्षाचे रोपण पोलीस हवालदार श्री. पानवळ प्राचार्य कुमार आडके, बी.आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षसंवर्धनातुन पर्यावरण रक्षण करण्यासाठी हरित सेना शाळेमध्ये काम करत आहे. एक वटवृक्ष शेकडो वर्षे पर्यावरणात प्राणवायु सोडत असतो. हा वृक्ष बहुगुणी असुन यांच्या सहवासात अनेक पक्षी येत असतात, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. आज एखाद्या भागात वटवृक्ष नसेल तर वटपोर्णिमेला स्त्रिया वटवृक्षाच्या फांदया विकत आणून त्याचे पुजन करतात. मात्र या शाळेतील हरित सेनेच्या विद्यार्थांनी वटवृक्षाचे रोपन करून अनोख्या पध्दतीने या सणाला आधुनिक रूप प्राप्त करून दिले आहे. आभार शंकर आंबवडे यांनी मानले.
 
Web Title: vatpornima celebrated in undale by planting trees