किलोभर वांग्यांसाठी मोजा 100 रुपये..! 

दत्ता इंगळे 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

नगर तालुका : किलोभर वांगी घ्यायचीत; मग थांबा. आधी खिसा तपासा नि मगच खरेदी करा. कारण एक किलो वांग्यांचा दर चक्क शंभर रुपयांवर जाऊन पोचला आहे. फक्त वांगीच नव्हे, तर बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दरही गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. रोजच्या जेवणात भाजी काय करावी, असा प्रश्‍न महिलावर्गाला पडत आहे. 

भाज्यांच्या दराचा विक्रम 

परतीच्या पावसाने खरीप पिकांसह पालेभाज्या व फळभाज्यांना फटका बसला. वेल, रोपे, तोडणीला आलेल्या फळभाज्या, काढणीला आलेली भाजी शेतातच पाण्यात सडली. भाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारातील आवक घटली. परिणामी, भाज्यांचे दर रोजच नवनवे विक्रम करीत आहेत. त्यातून मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. 

अतिपावसाचा फटका 

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड केलेली कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू व चुका या पालेभाज्या काढणीला आल्या होत्या. त्याच वेळी परतीच्या पावसाला सुरवात झाली नि सर्व भाजीपाला शेतातच सडला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. दोडकी, घोसाळी, कारली, वाल, काकडी, घेवडा यांचे वेल सडले. पिवळे पडले. वांगी, टोमॅटो, तोंडलीची रोपे जमिनीतच आडवी झाली. तोडणीला आलेला माल जागीच सडला. कांद्याचे जमिनीतच पाणी झाले. 

आर्थिक गणित बिघडले 

डोक्‍याला हात लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. पावसातून वाचलेला भाजीपाला सध्या अव्वाच्या सव्वा दराने विकला जात आहे. त्यातून सर्वसामान्य ग्राहकांचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

नगरमधील भाज्यांचे दर (किलोमागे) 

काकडी- 60 
वांगी- 100 
कांदा- 70 
टोमॅटो- 75 
बीट - 65 

मेथी- 25 (जुडीला) 
कोथिंबीर- 20 
पालक- 22 
शेपू-चुका- 24 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices increased