भाज्यांचे दर कडाडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कोल्हापूर - वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाची झळ सामान्य माणसाला बसण्यास सुरुवात झाली आहे. कांदा, बटाटा, धान्याची आवक घटली असून भाज्यांचे दरही वाढले आहेत. संपाच्या पाचव्या दिवशी माथाडी संघटना, विविध वाहतूक संघटनांनी वाहतूक दारांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. वाहतूक दारांच्या संपाची व्याप्ती वाढली आहे. लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे उजळाईवाडी येथे लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. 

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशपातळीवर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. देशभरातील ट्रक व टेम्पो संघटना, जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशननेही या संपात सक्रिय सहभाग घेतला. एक महिन्यापूर्वी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांना संपाची कल्पना होती. त्यांनी नेहमीपेक्षा अधिक माल मागवला होता; पण हा मालही चार ते पाच दिवसच पुरणारा होता. बाजारपेठेत मालाचा तुटवडा निर्माण झाला. विशेषतः कांदा, बटाटा, धान्य, साखर यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ट्रक आणि टेम्पो बंद असल्याने डिझेलच्या मागणीतही घट झाली असून, पेट्रोलपंप चालकांनाही आर्थिक फटका बसला आहे. वाहतूक दारांच्या संपामुळे भाज्यांची वाहतूकही थंडावली. त्यामुळे भाज्यांचे दरही काडडले. कांदा-बटाट्यांचा दर सुमारे ३० रुपये किलो झाला आहे. पालेभाज्यांचा दरही वाढले. आता सामान्य माणसाला संपाची झळ पोचू लागली आहे. साखर, धान्य, कडधान्ये यांची आवक घटल्याने याचे जरही वाढले आहेत. वाहतूक दारांचे चक्का जाम आंदोलन जर थांबले नाही तर पुढील दोन तीन दिवसात शहरात जीवनावश्‍यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: vegetable rate increase by transporter strike