ट्रायलच्या नावाखाली कोल्हापुरात मोटारीची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

  • तुमची मोटार विकत घेणार आहे, जरा ट्रायल घेऊन येतो असे सांगून भामट्याने चोरली पाच लाखांची अलिशान मोटार.
  • याबाबत सुनील बबन रेणके (वय 46, रा. सरनोबतवाडी, करवीर) यांची फिर्याद.
  • गुन्हा नोंद झोलल्या संशयिताचे नाव - उमेशकुमार विद्याचल तिवारी (चिखली, पुणे)

कोल्हापूर - तुमची मोटार विकत घेणार आहे, जरा ट्रायल घेऊन येतो असे सांगून भामट्याने पाच लाखांची अलिशान मोटार चोरून नेली. याची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद सुनील बबन रेणके (वय 46, रा. सरनोबतवाडी, करवीर) यांनी दिली. गुन्हा नोंद झोलल्या संशयिताचे नाव - उमेशकुमार विद्याचल तिवारी (चिखली पुणे) असे आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, उमेश रणके यांचा राजारामपुरी 12 व्या गल्लीत नाष्टाची गाडी आहे. त्यांची एक अलिशान मोटार आहे. ती त्यांना विकायची होती. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 2018 ला जाहीरात दिली होती. ते 26 फेब्रुवारी 2018 ला नाष्टाची गाडी चालवत होते.

दरम्यान उमेशकुमार तिवारी तेथे आला. त्याने "मोटार विक्रीची जाहीरात आल्याचे पाहून आलो आहे. माझे शाहूपुरीत नोकरी मार्गदर्शन केंद्र आहे. मला तुमची गाडी विकत घ्यायची आहे' असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्याने पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवान्याची झेरॉक्‍स रेणके यांना दिली. त्यानंतर त्यांना मोटारीची ट्रायल घेऊन 15 मिनीटात येतो असे सांगितले.

त्याच्यावर विश्‍वास ठेऊन रेणके यांनी त्याला पाच लाख रूपये किमंतीची मोटार दिली. मात्र तो ती मोटारच घेऊन पसार झाला. याबाबत त्यांनी काल रात्री राजारामपुरी पोलिसात फिर्याद दिली. पोलिस संशयित उमेशकुमारचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle theft in Kolhapur under the name of trial