तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं पाहतो..!

तात्या लांडगे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सोलापूर : भाजप पदाधिकारी व नगरसेवकांना विमानतळाच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या स्वागतासाठी येऊ न दिल्याने भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि पोलीस आयुक्‍त महादेव तांबडे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली.

पवार हे तांबडे यांना म्हणाले, ''डबा द्यायचा आहे; पण तुम्ही आत सोडत नसल्याने तो आता तुम्ही द्या.'' तेव्हा तांबडे यांनी पवार यांना म्हणाले की, 'ते काम आमचे नसून तुम्ही तुमचे बघा, आम्ही आमचे पाहतो.'

सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचे आगमन होणार असल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर हे विमानतळाबाहेर उभे होते.

भाजपच्या मोजक्‍या पदाधिकाऱ्यांना आत न सोडल्याने मी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला येणार नाही, अशी ठाम भूमिका श्री. पवार यांनी घेतली. परंतु, अध्यक्ष तसे नसते, चला असे सहकारमंत्र्यांनी म्हणताच आणि हा प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे श्री. ढोबळे यांनी सांगितले तसेच श्री. मेंगजी यांनीही आत येण्याची विनंती केली.

त्यावेळी श्री. पवार यांनी विमानताळाच्या आत प्रवेश केला. पोलीस आयुक्‍तलयाकडून रात्री उशिरा प्रवेशासाठी पासेस मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बहुतांशी पदाधिकाऱ्यांकडे पासेस नव्हते. त्यामुळे हा प्रकार घडला, असे पालकमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी सांगितले. तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक विमानतळाच्या आत उपस्थित होते. 

 सहकारमंत्र्यांना तरी जाऊ द्या... 
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचे विमानतळावर आगमन होताच, भाजप पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मोठी गर्दी स्वागतासाठी त्यांच्या दिशेने जात होती. तेव्हा वाटेत पोलिसांनी उर्वरित पदाधिकाऱ्यांना जाण्यास मज्जाव केला. त्यामध्ये सहकारमंत्र्यांचाही समावेश होता.

काही पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांना तरी जावू द्या, असे सांगताच पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि त्यांना आत सोडले. तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांना मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जाण्यासाठी आपले ओळखपत्र पोलिसांना दाखवावे लागले. 

Web Title: Verbal spat between BJP District President and Police Commissioner in Solapur