मंगळवेढा ते निंबोणी रस्त्याची चाळण

मंगळवेढा ते निंबोणी रस्त्याची चाळण

मंगळवेढा : मंगळवेढा ते निंबोणी रस्त्यावरील खड्डे, खोमनाळ गावाजवळील धोकादायक वळणावरील खड्डे, तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने बुजवले. त्याबद्दल वाहनधारकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. पण इतर छोटे खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम खात्याने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. या मार्गावरील वाहतूक जीवघेणी होत असून यात अनेकांचे बळी गेलेले आहेत.

रत्नागिरी-नागपूर या महामार्गाच्या कामाचा मंगळवेढा परिसरातील ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीचे वाहनतळ देखील या रस्त्यालगत आहे. तीन किमी अंतरावर असून महामार्गाचे काम सुरु झाल्यावर मोठया प्रमाणात अवजड वाहतूक कमी रुंदीच्या या रस्त्यावरुन जाणार आहे. मंगळवेढा ते उमदी या महामार्गाचे काम सध्या सुरु असल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक सध्या जवळचा पर्यायी मार्ग म्हणून मंगळवेढा ते निंबोणी या मार्गावरुन जात आहे. शिवाय भैरवनाथ कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाल्यामुळे या कारखान्याची ऊस वाहतूकही याच मार्गावरुन जातात.

सध्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खडडे पडले असून एक खड्डा चुकविण्यासाठी दुसऱ्या खड्ड्यात जावे लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेली फिरंगीची झाडे देखील त्रासदायक ठरु लागली आहेत. शिवाय या रस्त्यावरील साईड पट्टीही खचल्यामुळे अवजड वाहन आल्यावर दुचाकीस्वाराला ओव्हरटेक देखील करता येत नाही. सध्या कारखान्याने खोमनाळ व आसबेवाडी परीसरात असलेले मोठे खड्डे मुरम टाकून बुजवले असल्याने ऊस वाहतुक करणाय्रा वाहनाबरोबर अन्य वाहनाची सोय झाली असली तरी बांधकाम खात्याने रुंदीकरण करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com