पोलिस वसाहतींची दुरावस्था

राजकुमार शहा 
मंगळवार, 19 जून 2018

मोहोळ : मोहोळ येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन इमारत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. मोहोळ हा चर्चेतला तालुका आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस ठाणे असल्याने महत्वाच्या व्यक्ती सुरक्षा अपघात अंदोलने बंदोबस्त यामुळे येथील पोलीसावर कायम कामाचा ताण असतो.

मोहोळ येथे पोलिसांना राहण्यासाठी हक्काची जागा नसल्याने अनेक कर्मचारी सोलापुराहुन ये जा करतात. कामापेक्षा त्यांचा वेळ येण्याजाण्यात खर्च होतो. सध्याच्या पोलीस वसाहतीच्या इमारतीवर पिंपळाची झाडे वाढली आहेत. तर परिसरात चिलारी व रबरी वेलांचे साम्राज्य आहे. त्यामुळे सर्प व विंचवाची भिती आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

मोहोळ पोलीस ठाण्याने 22 ऑगष्ट 2017 मधे 62 कर्मचारी व 6 अधिकारी यांच्या निवासस्थानाचा प्रस्ताव अधिक्षक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यांनी तो वरिष्ठांकडे पाठविला असून सध्या तो व्यवस्थापकीय संचालक पोलिस ग्रह निर्माण महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान ग्रह निर्माण विभागाचे अधिकारी मोहोळ येथे  येऊन जागेची पाहणी करून गेले आहेत तातडीने हे काम सुरु झाले तर पोलिस कर्मचाऱ्यांची मोठी सोय होणार आहे

Web Title: very band condition of police colonies