आजरा येथील हिरण्यकेशीवरील व्हिक्‍टोरिया पुल बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

आजरा - मुसळधार पावसामुळे येथील व्हिक्‍टोरिया पुलाने धोक्याची पातळी गाठली आहे. यासाठी हा पुल सायंकाळी चार वाजता वाहतूकीस बंद केला आहे. 130 वर्षात येथील वाहतूक बंद करण्याची ही पहिल्यांदाच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हिरण्यकेशी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. येथील व्हिक्‍टोरिया पुल 1889 साली बिटीशांनी बांधला. पुरामुळे पुलाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा पुल वाहतुकीस बंद केल्याचे तहसिलदार प्रदिप उबाळे यांनी सांगितले आहे. यामुळे आजऱ्यासह जिल्ह्याचा संपर्क तुटला असून आजरा मार्गे आंबोली कोकणची वाहतूक ठप्प झाली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victoria bridge closed on Hiranyakashi in Ajra