स्मार्ट सिटी सोलापुरात उभारणार "बोलकी भिंत' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर -  गुड मॉर्निंग सोलापूरकर...गुड आफ्टरनून सोलापूरकर..हा मंजुळ आवाज लवकरच ऐकायला मिळणार आहे येथील रंगभवन चौकात. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, रंगभवन चौकात व्हिडिओ स्क्रीनच्या रूपात "बोलकी भिंत' उभारली जाणार आहे. 

सोलापूर -  गुड मॉर्निंग सोलापूरकर...गुड आफ्टरनून सोलापूरकर..हा मंजुळ आवाज लवकरच ऐकायला मिळणार आहे येथील रंगभवन चौकात. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, रंगभवन चौकात व्हिडिओ स्क्रीनच्या रूपात "बोलकी भिंत' उभारली जाणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या रंगभवन चौक ते डॉ. आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. रंगभवन चौक ते मराठा मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्ञानप्रबोधिनी ते डॉ. आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. रंगभवन चौकातील आयलॅंड सुशोभीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. शहराच्या महत्त्वाच्या स्थळांकडे जाणारा हा रस्ता आहे. त्यामुळे या चौकातच बोलकी भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत स्मार्ट सिटीतील वेगळे आकर्षण असणार आहे. 

ही भिंत केवळ "गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून'ने स्वागत करण्यापुरती मर्यादित नसेल. तर लोकांचे प्रबोधनही केले जाणार आहे. जसे स्वच्छता राखा, वाहनांचे नियम पाळा, वाहनातून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या, या सूचनाही या भिंतीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. शासकीय योजनांची माहितीचे प्रसारणही भिंतीच्या माध्यमातून केले जाणार आहे. या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा परिषदही आहे, स्मार्ट रस्त्याकडे जाण्याची सुरवात या ठिकाणाहूनच होणार आहे. ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेच्या कालावधीत भाविकांनी घ्यावयाची दक्षता, याच्याही सूचना दिल्या जाणार आहेत. 

दीड महिन्यात उभारली जाईल भिंत 
बोलकी भिंत उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. ती मंजूर झाल्यानंतर दीड महिन्यात ही भिंत उभारली जाईल. बाहेरून सोलापुरात येणाऱ्या पर्यटकांचे हे आकर्षण ठरणार आहे. हे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

Web Title: video screen wall to set up in Smart City Solapur