Video : ये भावड्या.. ट्रम्प तात्या अन मेलानिया काकी आलेत महाराष्ट्रात.. कवा, कधी ते बघा तुम्हीच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

काहींनी त्यांच्या भारतभेटीचे खुल्या दिलाने स्वागत केले. काहींनी ट्रम्प यांच्या दौऱ्यावर झालेल्या वारेमाप खर्चावर बोट ठेवले आहे. तर तिसरीकडे म्हणजे त्या दोघांच्या मध्यस्थानातील लोकांनी म्हणजे उपहासाचा आधार घेत ट्रम्प यांच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे. 

नगर ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून त्यांनी गुजरातमध्ये फेरफटका मारला. काही करारावर सह्याही केल्या. प्रेमाचे प्रतीक आणि वास्तूकलेचा अजोड नमुना असलेल्या ताजमहलासही त्यांनी भेट दिली. हे संपूर्ण जगाने पाहिले. मात्र, ट्रम्प तात्या अन मेलानिया काकींनी महाराष्ट्राचाही दौरा केला. हे कोणालाच माहिती नाही.

 

trumpendra

त्यांच्या स्वागताला होती सोशल मीडियातील तरूणाई. सोशल मीडियातील अवभगत त्यांना आवडली. 
गेल्या पंधरा दिवसांपासून ट्रम्प पुराण सोशल मीडियात सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यावरून समाज माध्यमांच्या कट्ट्यावर वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत.

काहींनी त्यांच्या भारतभेटीचे खुल्या दिलाने स्वागत केले. काहींनी ट्रम्प यांच्या दौऱ्यावर झालेल्या वारेमाप खर्चावर बोट ठेवले आहे. तर तिसरीकडे म्हणजे त्या दोघांच्या मध्यस्थानातील लोकांनी म्हणजे उपहासाचा आधार घेत ट्रम्प यांच्या दौऱ्यावर भाष्य केले आहे.

काही मंडळींनी मिम्स बनवले आहेत. ट्रम्प यांना फेटा आणि ओठावर महाराष्ट्रीय पद्धतीच्या तलवार कट टाईप मिशा चिकटवून त्यांना एकदम मराठमोळे करून टाकले आहे. अगदी आपल्या नगरमधील नेटकरी मंडळींनी त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. 

ट्रम्प तात्या तुम्ही नगरला आले तर आमचा उड्डाणपूल तयार होईल. काहींनी तर उड्डाण पुलाच्या खाली ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया फिरत आहेत, असे दाखवून धम्माल उडवून दिली आहे. खारे टीव्हीवरील प्रहसनाने तर लोक लोटपोट होत आहेत. महाराष्ट्रातील मिसळ, भजी आपल्याला खूप आवडत असल्याचे भाष्य करतानाही त्यावर दाखवले आहे. ते महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी एकरूप झाल्याचे दिसते आहे.

मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तात्या हे नाव दिले, ही आपुलकी मला कुठेच मिळाली नाही. तुमच्या मराठमोठ्या स्वागताचा मी फॅन झालो आहे, असेही ट्रम्प नेटकरी मंडळींशी संवाद साधत असल्याचे डबिंग करून धमाल उडवून दिली आहे.

ट्रम्प यांच्यावरील कोणत्याही व्हिडिओ आणि कार्टूनला तुफान लाईक्‍स मिळत आहेत. तेवढ्याच प्रमाणात ते शेअरही केले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video: Trump Tatya An Melania Aunty In Maharashtra