बापरे! 'गेम'मधील गोळीबाराचे हावभाव.. काय झालंय या तरुणाला?

परशुराम कोकणे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

⬛ रेल्वे स्थानक परिसरातील व्हिडिओ व्हायरल 
⬛ मोबाईल गेममुळे डोक्‍यावर परिणाम झाल्याचे म्हणणे 
⬛ पोलिसांकडून होतेय चौकशी 
⬛ नेमके कारण अद्याप अस्पष्ट

सोलापूर : मोबाईल गेममधील हाणामारीच्या प्रसंगानुसार हावभाव करत खांबाला, झाडाला आणि दरवाजाला धडकणाऱ्या तसेच रिक्षा उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे व्हिडिओ सोलापुरातील विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील असून त्या तरुणाला नेमके काय झाले आहे? याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. 

हेही वाचा : बापरे.. 'यामुळे' त्याने कापून घेतले गुप्तांग!

कोणी पब्जी गेम खेळत असेल तर... 
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचे वय अंदाजे 22 ते 25 आहे. रेल्वे स्थानक परिसरात हातात बंदूक घेऊन गोळीबार करत असल्यासारखे त्याचे हावभाव आहेत. परिसरातील काही तरुणांनी त्याच्या हालचाली दोन दिवसांपूर्वी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्या आहेत. दोन दिवसांत सोलापुरातील विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर त्या तरुणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. "आपल्या आसपास कोणी पब्जी गेम खेळत असेल तर त्याला हा व्हिडिओ दाखवा.. तुमच्या मुलांना या गेमपासून लांब ठेवा..' असा संदेशही व्हिडिओसोबत जोडण्यात आला आहे. 

हेही वाचा : सावधान... सोलापूरकरांसाठी ही धोक्‍याची घंटा

तरुणावर मानसिक परिणाम 
याबाबत खात्री करण्यासाठी "सकाळ' प्रतिनिधीने रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी तसेच रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांशी संवाद साधला. "दोन दिवसांपूर्वी हा तरुण दिसला होता, मोबाईल गेममुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यामुळे तो असे करत आहे' असे रिक्षाचालकांनी सांगितले. दरम्यान, व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाच्या हालचाली पब्जी आणि फ्री फायर या मोबाईल गेममध्ये असलेल्या ऍक्‍शनप्रमाणेच असल्याचे गेम खेळणाऱ्या तरुणांनी सांगितले. 

पोलिस म्हणतात... 
रेल्वे स्थानक परिसरात एक तरुण मानसिक रुग्णाप्रमाणे हावभाव करत असल्याचा व्हिडिओ मीही पाहिला आहे. हा तरुण दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात फिरत होता. परिसरातील रिक्षाचालकांनी त्याचा व्हिडिओ काढून शेअर केला असल्याची शक्‍यता आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही त्या तरुणाचा शोध घेत आहोत. 
- अल्फाज शेख, 
पोलिस उपनिरीक्षक, रेल्वे स्टेशन पोलिस चौकी 

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.. 
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचे हावभाव मनोरुग्णासारखे आहेत. त्याच्यावर उपचार होऊ शकतो. अशा रुग्णांना ते काय करत आहेत कळत नाही. बाइपोलर डिसऑर्डर हा मानसिक विकृतीचा एक गंभीर प्रकार आहे. जो मूड डिसऑर्डरचा एक प्रकार आहे. या आजाराने ग्रस्त रुग्ण आळीपाळीने दोन विरुद्ध भावनेमध्ये जात राहतो. एका मूडला फॅड किंवा उन्माद असे म्हणतात आणि दुसऱ्याला मनाची उदासीनता. मोबाईल गेमच्या ऍडिक्‍शनमुळे हे झाले नाही. गेमचे ऍडिक्‍शन झालेले रुग्ण कायम गेम खेळत बसतात. 
- डॉ. नितीन भोगे, मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Videos of a young boy have gone viral