Vidhan Sabha 2019 : मोदी, अमित शहा यांना झोपेत पण पवार दिसत असतील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

श्री. पवार म्हणाले, सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो. या सरकारला ते विस्मरण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये अवस्था या सरकार विरोधात दिसत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही चितेची बाब आहे. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आम्ही सरसकट कर्जमाफी केली. पण भाजप सरकारने सरसकट कर्जमाफी केली नाही. आमचे सरकार तुमच्या दुखण्यामध्ये सहभागी होत होते. पण आत्ताचे सरकार तसे नाही.

शरद पवार म्हणाले...

  • सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 50 टक्के कारखाने बंद पडले आहेत. 
  • विमान कंपन्या बंद पडले आणि 20 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
  • केंद्र आणि राज्य सरकार काहीच करत नाही..
  • शेती संकटात, बेरोजगारी वाढली अनेक उद्योग बंद पडले कसे
  • स्वर्गीय आर आर पाटील यांनी डान्सबार बंद केले आणि हे लोक छमछम दाखवत आहात. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. 
  • पाच वर्षात काय केले तर ते सांगतात 370 ही काय भानगड आहे. 370 काढले आणि आता म्हणतात 370 लावून दाखवा. हे काय.. 
  • शेतकरी कर्ज बाजारी, तरुण बेरोजगारी आहे. पण यांचे सकाळ संध्याकाळ 370 हेच भाषण चाललंय. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidha Sabha 2019 Sharad Pawar comment on Naraendra Modi and Amit Shah