पृथ्वीराज देशमुखांचा विधान परिषदेसाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सांगली - विधान परिषदेच्या ११ जागांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपच्या पाच उमेदवारांची घोषणा दिल्लीतून करण्यात आली होती. परंतु पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल करण्यास नकार देत रासप मधून अर्ज दाखल केला. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ऐनवेळी श्री. देशमुख यांचा अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येते.

११ ही जागा बिनविरोध होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. पैकी पाच जागांवर भाजप, शिवसेना दोन, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि शेकाप एक असे प्रतिनिधीत्व मिळणार आहे. भाजपकडून ५ नावाची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली.

त्यानुसार पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील, रमेश पाटील आणि नीलय नाईक यांची उमेदवारी घोषित केली. परंतु मंत्री जानकर यांनी ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट  धरला. त्यामुळे नेतेमंडळींची गोची झाली.

जानकर यांनी रासपमधून अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचानक जिल्हाप्रमुख  देशमुख यांना अर्ज भरण्यास बोलवले. त्यामुळे देशमुख यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज भरला. तांत्रिक अडचण निर्माण होऊन छाननीत अर्ज बाद ठरला जाऊ नये,  यासाठी ऐनवळी श्री. देशमुख यांना अर्ज भरण्यास सांगितला गेला आहे. शुक्रवारी (ता. ६) अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर उमेदवारी अर्जाबाबतचे चित्र  स्पष्ट होईल. नऊ जुलै ही माघारीची तारीख आहे.  त्यामुळे छाननीनंतर देशमुखांचा उमेदवारी अर्ज ‘डमी’ की खरोखर ते निश्‍चित होईल.

Web Title: vidhan parishad election form prithviraj deshmukh politics