खलबते...मुंबई अन्‌ सांगलीतही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

सांगली - येत्या 19 नोव्हेंबरला होणाऱ्या राज्यातील सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या (ता. 5) आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली तुटली असे म्हणतच आजही दिवसभरात मुंबईत दोन्ही पक्षश्रेष्ठींची खलबते सुरूच राहिली. त्याचवेळी सांगलीतही रात्री उशिरापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू होता.

राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्या सातारा जिल्ह्यातच पक्षांतर्गत खदखद आहे. त्याचा नेमका फायदा उचलण्याच्या स्थितीत कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम आहेत. मात्र, त्यांच्या वाटेत सांगलीतूनच बंडखोर उमेदवार शेखर माने यांच्या उमेदवारीने अडथळे निर्माण झाले आहे. काल रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाने माजी मंत्री सतेज पाटील यांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी विश्‍वजित कदम यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली. या चर्चेतून तोडगा दृष्टिक्षेपात आल्याची भावना कॉंग्रेस वर्तुळातून व्यक्त झाली. मात्र, उपमहापौर गटाने या चर्चेवर भाष्य टाळून आपला पवित्रा कायम ठेवला. त्यांच्या गटाचे समर्थक मतदार शहराबाहेर रवाना झाले. रात्री उशिरा महापालिकेतील सत्ताधारी गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी कळंबीत कॉंग्रेस नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र, कॉंग्रेसमधील उपमहापौर गटाचे व सुरेश आवटी गटाचे सहा सदस्य बाहेरगावीच होते. या बैठकीसाठीही गटनेते किशोर जामदार, विश्‍वजित कदम, जितेश कदम यांनी हजेरी लावली.

Web Title: vidhan parishad election sangli