Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्रीपदाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

बेरोजगारी, दुष्काळ आणि कर्जमुक्त भगवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यासाठी संधी द्या. कधी ना कधी तरी मला मुख्यमंत्री म्हणून बघाल, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

विटा - बेरोजगारी, दुष्काळ आणि कर्जमुक्त भगवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. त्यासाठी संधी द्या. कधी ना कधी तरी मला मुख्यमंत्री म्हणून बघाल, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. 

विटा येथे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. 

Vidhan Sabha 2019 : कणकवलीत उद्धव ठाकरे यांची राणेवर आगपाखड 

श्री. ठाकरे म्हणाले, राज्यातील १११ मतदारसंघ व २५ जिल्हे फिरलो. परंतु निवडणूक आहे असे वाटत नाही. इतर पक्ष कोठे दिसत नाहीत. दिसतोय केवळ भगवा. गेल्या पाच वर्षाचे काम बघून जनता आमच्या बरोबर आहे. विरोधी पक्षातील चांगले नेते पक्षात अडकले होते. ते आता महायुतीत आले आहेत. पण यापुढे शिवसेनेत अपक्ष आमदारांना स्थान मिळणार नाही, असेही श्री. ठाकरे म्हणाले. 

Vidhan Sabha 2019 : महात्‍मा फुले, सावरकरांना ‘भारतरत्‍न’ दिलाच पाहिजे 

श्री. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम आम्ही करून दाखविले आहे. सत्ता येते, सत्ता जाते. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. मला मुख्यमंत्री, मंत्रीपद द्यायचे हे जनतेच्या हातात आहे. सत्ता असो किंवा नसो लोकांची साथ करायची आहे. गेल्या दशकात दुष्काळमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे होता. पाच वर्षे जे शिवसेनेने काम केलं ते लोकांच्या समोर आहे. विविध आंदोलने केली. दहा लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रूपये मिळवून दिले आहेत. गाव ते शाळा अशा पंचवीस हजार बसेस सुरू करावयाच्या आहेत. 

Vidhan Sabha 2019 : लबाड कोल्हे, लबाड कोल्हे....यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Aditya Thackeray comment about Chief Minister post