VidhanSabha 2019 : अजितराव घोरपडे यांना भाजपची उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे शिफारस

VidhanSabha 2019 : अजितराव घोरपडे यांना भाजपची उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे शिफारस

कवठेमहांकाळ - तुमच्या मनात तेच माझ्या ध्यानात आहे. मी पोस्टमन आहे. तुमचे पत्र इच्छितस्थळी पोहचवतो, असे सांगत तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे यांना भाजपची उमेदवारी देण्यासाठी श्रेष्ठींकडे शिफारस करू, मात्र त्यांना विजयी करण्याची जबाबदारी जनतेची आहे. जिल्ह्यातील सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. 

विकास सोसायटीच्या नूतन वास्तूचे उद्‌घाटन श्री. देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवर व सोसायटीच्या माजी अध्यक्ष व कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.

इमारतीच्या उद्‌घाटनाला शेतकरी, सामान्य उपस्थित आहे. त्यांच्या मनात आपला नेता आमदार व्हावा असे आहे. आपणही लपवून ठेवणार नाही. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपची घोरपडेंना मिळावी म्हणून श्रेष्ठींकडे पोस्टमनची भूमिका बजावू. उमेदवारी मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले,‘‘महाराष्ट्रातील मुठभर लोकांनी सहकार बुडवला. तर चांगल्या मूठभर लोकांनी सहकारात आदर्श निर्माण केला. त्याचा आदर्श कवठेमहांकाळची विकास सोसायटी आहे. घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप झुरे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने गरूडझेप घेतली.’’ 

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी म्हैसाळ योजना पुर्ण करून भागाचे नंदनवन केले. त्यानंतर आपणही जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला, असे सांगून खासदार पाटील म्हणाले,‘‘विधानसभा निवडणूकीत पक्षाचे काम प्रमाणिकपणाने करू. पक्षाने टाकलेली जबाबदारी पुर्ण करू. उमेदवारी देण्याचे काम आपल्या हातात नाही. पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना विजय मिळवून देवू.’’

सहकारामुळे शेतकऱ्यांचा विकास झाला आहे. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. भविष्यात सहकाराच्या माध्यमातून विभागामध्ये आर्थिक क्रांती घडवू, अशी ग्वाही माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी दिली. आमदार पृथ्वीराज देशमुख, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांचीही भाषणे झाली.

संस्थेचे अध्यक्ष दिलीप झुरे यांनी प्रास्ताविक केले. राजवर्धन घोरपडे, डी. के. पाटील, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब गुरव, नगराध्यक्ष पंडीत दळवी, डॉ.पी. के. पाटील, अनिल लोंढे, चंद्रशेखर सगरे, किशोर पाटील, नंदकुमार घाडगे, पांडुरंग पाटील, तानाजी यमगर, दादासाहेब कोळेकर, जीवनराव पाटील, तात्यासाहेब नलवडे, हायूम सावनूरकर, मिलिंद कोरे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल भोसले, संचालक विश्वनाथ पाटील, दिनकर पाटील, गजानन कोठावळे, युवराज जाधव, निवृत्ती पाटील, नूरमुहम्मद शिरोळकर, शंकर बंडगर, वासंती जगताप, मंगल शेटे, सचिव विजय सुर्यवंशी यांच्यासह सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.

अजितराव हुशार, देशमुख चतूर
राज्यात भाजपला २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्नास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी देत अजितराव घोरपडे  हुशार नेते आहेत. त्यांनी या कार्यक्रमात राजकीय न बोलता सहकारवर बोलले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख हे चतूर असून विधानसभेची जबाबदारी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर टाकली.मी पोस्टमन असून, तुमच्या भावनेच पत्र इच्छितस्थळी पोहचवितो, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com