Vidhan Sabha 2019 : अजितराव घोरपडे अखेर शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कवठेमहांकाळ - माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे बुधवारी (ता.२) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. घोरपडे शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघ महायुतीतून शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या हातात धनुष्यबाण आले आहे. गेले काही दिवस घोरपडे यांना भाजपाची उमेदवारी मिळणार हे बोलले जात होते. त्यामुळे घोरपडे यांनी गेले चार महिने मतदारसंघाच जनसंपर्क वाढवून प्रचार सुरू केला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोरपडे यांचे स्वागत केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नेते अनिल देसाई,  तात्यासाहेब नलवडे, पांडुरंग पाटील उपस्थित होते. घोरपडे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने गुरुवारी महायुतीच्या घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक तासगाव व कवठेमहांकाळ येथे होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Ajitrao Ghorpade enters in Shivsena