Vidhan Sabha 2019 : तासगावमधून अजितराव घोरपडे यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

तासगाव - प्रचंड शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने भाजप शिवसेनेचे  कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आज सारा माहोल भगवा झाल्याचे दिसत होते.

बाजार समितीमधील खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयातुन पदयात्रा निघाली. पदयात्रेमध्ये युवकांची आणि महिलांची संख्याही लक्षणीय होती. लेझीम आणि हलगीच्या ठेक्यावर सहभागी कार्यकर्त्यांनी ताल धरला होता. भगवे झेंडे घेऊन मोटारसायकल वरून युवक शहरातून घोषणाबाजी करत फिरत होते. 

तासगाव सांगली रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमध्ये पदयात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सभेत खासदार संजयकाका पाटील, अजितराव घोरपडे, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, बजरंग पाटील यांची भाषणे झाली.

अजितराव घोरपडे यांनी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत बजरंग पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Ajitrao Ghorpade fill form from Tasgaon