Vidhan Sabha 2019 : शिरोळमधील बंडखोर यादव यांचे ‘गोकुळ’ संचालक पद धोक्‍यात?

Vidhan Sabha 2019 : शिरोळमधील बंडखोर यादव यांचे ‘गोकुळ’ संचालक पद धोक्‍यात?

कोल्हापूर - शिरोळ विधानसभेच्या आखाड्यात बंडखोरीचा झेंडा घेतलेले ‘गोकुळ’चे संचालक अनिलराव यादव यांचे पद धोक्‍यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आघाडीचा धर्म न पाळता त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सेनेत मोठी खदखद आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते डॉ. संजय पाटील आणि आमदार उल्हास पाटील यांची कोल्हापूर विमानतळावर भेट झाली, तेव्हा ओघाने पुढे आलेल्या मुद्द्यावर बोलताना मंत्री पाटील यांनी यादव यांची हकालपट्टी करणार असल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. यामुळेच यादव यांचे ‘गोकुळ’ संचालकपदही अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर यादव यांना भाजपने ‘गोकुळ’वर संधी दिली. लोकसभेला सेना-भाजप युती झाली. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी धैर्यशील माने यांच्या प्रचारात मतदारसंघ पिंजून काढला. यामुळेच राजू शेट्टी यांना होम पिचवरच रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने आमदार उल्हास पाटील यांना भक्कम पाठबळ देत त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, तीन वर्षांपासून अंतर्गत कलहामुळे आमदार उल्हास पाटील विरुद्ध बहुजन विकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. बहुजन आघाडीतीलही काही मंडळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आमदार पाटील यांच्याबरोबर आहेत.‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांनी बंडखोरी केली.

बहुजन विकास आघाडीची त्यांना साथ लाभली. मात्र, भाजपनेच यादव यांना फूस लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे डॉ. संजय पाटील यांच्यासह आमदार उल्हास पाटील यांची विमानतळावर भेट झाली. शिरोळमध्ये बंडखोरांच्या प्रचारात पाठिंब्याबाबत मतदारांना सांगितले जात आहे. शिवाय, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना वगळता अन्य मंडळी प्रचारात सक्रिय नसल्याची बाब डॉ. पाटील यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणली.  

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे उमेदवार आमदार उल्हास पाटील यांनाच मदत करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील.
- चंद्रकांत पाटील,
प्रदेशाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com