मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यात युवकांचा मोठा वाटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी - युवकांच्या जोरावरच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांचा सत्तेवर आले. या सरकारने केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा वर्गांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

इचलकरंजी - युवकांच्या जोरावरच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांचा सत्तेवर आले. या सरकारने केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा वर्गांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

येथील मराठा मंडळ भवनमध्ये "कॉफी विथ युथ" चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांच्यासह धैर्यशील माने यांनी उत्तरे दिली. आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, ""महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामे केली आहे. त्यांच्या विकास कामांची गंगा आणखी पुढे नेण्यासाठी भाजप -शिवसेना आघाडीचे सरकार पून्हा एकदा सत्तेवर येण्याची आवश्‍यकता आहे."" 

युवा वर्गाचा जोश व उत्साह पाहता आमदार सुरेश हाळवणकर हे तिसऱ्यांचा आमदार होवून विजयाची हॅटट्रीक साजरी करतील.

-  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

खासदार धैर्यशील माने म्हणाले, ""युवा शक्तीमध्ये निर्माण झालेल्या चैतन्यामुळे मी खासदार झालो. संसदेत पहिला प्रश्‍न युवक व खेळाबाबत मांडला. इचलकरंजीतील युवकांचे भविष्य घडविण्यासाठी आमदार हाळवणकर यांना साथ देवून जगाच्या नकाशावर स्मार्ट इचलकरंजी बनवूया."" 

भाजप शासन संविधानाच्या विरोधात नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सावंत यांनी युवकाच्या एका प्रश्‍नांवर दिले. काम करीत रहा, यशप्राप्ती नक्की होईल, असा युवा वर्गाला संदेश देत आपली राजकीय वाटचाल त्यांनी यावेळी मांडत युवा वर्गासमोर आदर्श ठेवला. यावेळी बाबा देसाई, हिंदूराव शेळके, रविंद्र माने, दीपक पाटील, अनिल डाळ्या, रवी रजपूते, उदय बुगड, विनय महाजन आदी उपस्थित होते. 

पाच हजार तरुणाना स्वंयरोजगाराचे लक्ष्य 
शहरातील पाच हजार तरुणांना स्वंयरोजगार उपलब्ध करुन देण्याचे आपले लक्ष्य आहे. त्यासाठी जागा व अल्प व्याज दरांने अर्थसहाय्य दिले जाणार आहे, असे स्पष्ट करीत आमदार हाळवणकर यांनी तरुणांच्या सहकार्याने इचलकरंजी ब्रॅन्डची ओळख जागतील पातळीवर करुन देण्याचा मानस असल्याचे सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Chief Minister Pramod Sawant Comment