Vidhan Sabha 2019 : 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील'; प्रणिती शिंदेंनी केले मतदान

टीम ई-सकाळ
Monday, 21 October 2019

सोलापूर : सोलापूर शहर परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. पण, मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाचा उत्साह दाखवला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला. 

Image may contain: 3 people, people smiling, closeup and outdoor

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी सकाळच्या प्रहरात सोलापूरमधील जागृती प्रशाला येथे मतदानाचा हक्क बजावला. आज सोलापूर मध्ये पहाटे पासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार भरगोस मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress leader praniti shinde voting Solapur