Vidhan Sabha 2019: राधाकृष्ण विखे-पाटलांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणारे भाजप नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

शिर्डी : शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणारे भाजप नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे.

पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर
राधाकृष्ण विखे-पाटील पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने संधी न दिल्यामुळे त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना विजयही मिळाला. त्यानंतर स्वतः राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आता शिर्डीतून ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश जगन्नाथ थोरात रिंगणात आहेत. राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी आक्षेप नोंदवला आहे. 

No photo description available.

रितेश देशमुखने गाजवली लातूरची सभा

कोणी घेतला आक्षेप?
सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेस कडून शिर्डी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी आक्षेप नोंदवला आहे. सुरेश जगन्नात  थोरात हे संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रहिवाशी आहे.

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद

काय आहे आक्षेप?
विखे यांनी ज्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे. परंतु, त्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नोटरी करणाऱ्या व्यक्तीची पाच वर्षांसाठी नेमणूक असते. मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक असते. याशिवाय प्रतिज्ञापत्रात आपण उमेदवारास व्यक्तीश: ओळखतो, असे नोटरी करणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात आलेले नाही. तसेच, ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात आलेले नाही, यासह अन्यही आक्षेप विखे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress objection radha krishna vikhe patil nomination shirdi