Vidha Sabha 2019 : डॉ. नंदिनी बाभूळकर राष्ट्रवादीतून लढण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

चंदगड - आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची इस्लामपूर येथे भेट घेतली. चर्चेचा तपशील त्यांच्याकडून गोपनीय ठेवला जात असला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर राष्ट्रवादीतून उमेदवारी करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसात त्या नागपूरहून इकडे येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. 

चंदगड - आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची इस्लामपूर येथे भेट घेतली. चर्चेचा तपशील त्यांच्याकडून गोपनीय ठेवला जात असला तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर राष्ट्रवादीतून उमेदवारी करण्यास तयार असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसात त्या नागपूरहून इकडे येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. 

आमदार कुपेकर यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट करताना मुलीनेही निवडणुक लढू नये असे जाहिरपणे सांगितले होते. परंतु कार्यकर्त्यांना हा निर्णय मानवला नाही. त्यांच्या आग्रहामुळे नेसरी येथे मेळावा घेऊन दोन दिवसात निर्णय देण्याचे वचन दिले होते. भाजप की राष्ट्रवादी याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. या मुद्यावरुन कार्यकर्त्यांतही दोन गट पडले होते. कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पक्षाकडून प्रथम प्राधान्य कुपेकर, बाभूळकर यांनाच असल्याचे सांगितले होते.

दरम्यान शिवसेना - भाजप युतीची घोषणा आणि या मतदारसंघातून संग्रामसिंह कुपेकर यांची शिवसेनेतून उमेदवारी निश्‍चित झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारीची आग्रह धरला. आज शरद पवार हे जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इस्लामपूर येथे आले होते. त्यावेळी आमदार कुपेकर यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीही पवार यांनी आपले प्रथम प्राधान्य कुपेकरांनाच असल्याचे सांगितले.

या वेळी रामाप्पा करीगार, अमर चव्हाण, महाबळेश्‍वर चौगले, राकेश पाटील, राजेश पाटील, जयकुमार मन्नोळी, शिवप्रसाद तेली, अरुण मिरजे, जयसिंग चव्हाण आदी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ होते. यासंदर्भात डॉ. बाभूळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. आमदार कुपेकर यांनी फोन घेणे टाळले. मात्र दोन दिवसात डॉ. बाभूळकर उमेदवारी दाखल करणार हे निश्‍चित असल्याने त्या निवडणुक लढणार ही कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे. 

बाभूळकरांचा निर्णय घेऊनच चर्चा....
आमदार कुपेकर आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी डॉ. बाभूळकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी होकार दिल्यामुळेच चर्चेची फेरी झाली. त्यामुळे त्या लढणारच अशी प्रतिक्रीया एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Dr Nandini Babhulkar will fight from NCP