Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीकडून मुश्रीफ, के. पी. यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत कागल मतदारसंघातून आमदार हसन मुश्रीफ; तर राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतून या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या वाट्याला असणाऱ्या चंदगडच्या उमेदवारीचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला. 

विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यापूर्वी झालेली आहे. आघाडीत जिल्ह्यातील दहापैकी सात जागा काँग्रेसच्या; तर तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी कागल, राधानगरी, चंदगड मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेसने आपल्या वाट्याच्या सातपैकी २ मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ७८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये जिल्ह्यातील कागल आणि राधानगरी मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इस्लामपूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. साताऱ्यातून भाजप सोडून आलेल्या दीपक पवार यांना माजी आमदार शिवेंद्रराजे यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Hasan Mushrif, K P Patil candidate from NCP