Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राला कळू दे तेल लावलेले मुख्यमंत्री कसे दिसतात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला आमदार जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले नाही. 

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले नाही. 

कोल्हापूर विमानतळावरील ‘नाइट लॅंडिंग’चे काय झाले?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल 

येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांचा समाचार घेतला. श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री म्हणत आहेत की, विरोधक तेल लावून तयार नाहीत. आम्ही जर तयार नाही. मग महाराष्ट्रात इतक्या सभा कशा होत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेची गरज का वाटते ? २० ठिकाणी त्यांची सभा होते. पंतप्रधान यांच्या दहा ठिकाणी सभा घेत आहेत. आपल्याकडे मुलगा नापास झाला की त्याच्या आई-वडीलांना बोलवून घेतले जाते. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नापास झाले आहेत. म्हणून त्यांचे वडीलधारी दिल्लीतून आले आहेत. ते गावोगावी फिरत आहेत.  

Vidhan Sabha 2019 : रोजगारासाठी कोल्हापुरात आयटी हब उभारू ; अमित शहांचे आश्वासन 

श्री. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पेट्रोल डिझेल महागले आहे. बेकारी वाढली आहे. वस्त्रोद्योग बंद पडला आहे. अशा परिस्थितीमुळे राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित आहे. शरद पवार यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या भाजप - शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी जनता एकवटली आहे.

Vidhan Sabha 2019 :  नीतेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री; यातच सेनेचा विजय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Jayant Patil comment on Chief Minister Devendra Fadnavis