Vidhan Sabha 2019 : जाणून घ्या तुमचे मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

लोकसभा पोटनिवडणूक व सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी येत्या सोमवारी ( ता. 21) मतदान होणार आहे. अतिवृष्टीमुळे काही मतदान केंद्राचे ठिकाण बदलले आहे.

सातारा : जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मतदान केंद्राची पडझड झालेली होती. त्याची प्रशासनाने समक्ष पाहणी केली. ज्या इमारती धोकादायक असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आल्यानंतर संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्याचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले.

त्यास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानूसार सातारा विधानसभा मतदारसघांचे निवडणूक निर्णय अधिकारी मिनाझ मुल्ला यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातील जूने आणि नवे मतदान केंद्र जाहीर केली आहेत.
 
लोकसभा पोटनिवडणूक व सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी येत्या सोमवारी ( ता. 21) मतदान होणार आहे. अतिवृष्टीमुळे मतदान केंद्राचा भाग क्रमांक व नाव, जुन्या मतदान केंद्राचे नाव व बदल करण्यात आलेल्या केंद्राचे नाव पुढीलप्रमाणे - ः
भाग क्र 16. वहागाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहागाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी खोली क्र 1.
 
भाग क्र. 129 महीगाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महीगाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महीगाव खोली क्र.1.
 
भाग क्र 145 दरेखुर्द - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दरेखुर्द - दरेखुर्द नवीन अंगणवाडी खोली क्र. 1.

भाग क्र. 173 नागेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागेवाडी खोली क्र. 4 (जुन्या इमारतीसमोरील).

भाग क्र. 185 चोरगेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चोरगेवाडी - चोरगेवाडी अंगणवाडी खोली.

भाग क्र. 388 मोरेवाडी (वरची पवारवाडी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , मोरेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पवनगाव खोली क्र 2.

भाग क्र.411 धनवडेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धनवडेवाडी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धनवडेवाडी, खोली क्र 1 (जुन्या इमारतीसमोरील).
 
तरी सर्वांनी याची दखल घ्यावी. जास्ती जास्त मतदारांनी येत्या सोमवारी (ता. 21 ऑक्‍टोबर) मतदान करावे असे आवाहन सातारा विधानसभा मतदारसघांचे निवडणूक निर्णय अधिकारी मिनाझ मुल्ला यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Know your polling station