माजी आमदारांच्या भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही : हर्षदा देशमुख-जाधव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

गोंदवले : माण तालुक्यात माजी आमदारांकडून एमआयडीसी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सोडाच. पण, गुळाचे चांगले गुऱ्हाळदेखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी प्रभाकर देशमुख यांनाच साथ द्यावी, असे आवाहन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.

माण विधानसभा मतदारसंघात आमचं ठरलंय टीमचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ सत्रेवाडी (पिंगळी) येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हर्षदा देशमुख-जाधव बोलत होत्या. त्या वेळी नगरसेवक अजित पवार, बाबाराजे हुलगे, विभावरी भोसले, सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, ‘माण मतदारसंघात मीच पाणी आणल्याचे माजी आमदार सांगत सुटले आहेत. सगळीकडे पाणी आणले म्हणणाऱ्या या माजी आमदारांच्या बोराटवाडी गावात मग टँकर का सुरू होता? माणमध्ये एमआयडीसी आणल्याचेही हे सांगत आहेत. मात्र केवळ शंभर एकर जागेतील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग कुठून येणार? त्यामुळे केवळ भूलथापा देणाऱ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांना आता घरी बसविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय काळापासून माणमधील दुष्काळ हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.’

जलसंधारणाच्या माध्यमातून गावोगावी पावसाचे पाणी अडविण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे गावे पाणीदार झाली आहेत. पाण्याची उपलब्धता झाल्याने आता पाच हजार एकरात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रभाकर देशमुख प्रयत्नशील आहेत. मतदारसंघातील दुष्काळ हद्दपार करण्याबरोबरच उच्च प्रतीचे शिक्षण, आरोग्य सुविधा व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रभाकर देशमुख यांना मताधिक्य द्या, असे आवाहन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Maan Satara Harshada Deshmukh-Jadhav Speech