Vidhan Sabha 2019 : निवडणूक लढविण्याबाबत मालोजीराजे, मधुरिमाराजे असे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - विधानसभा निवडणूकीसाठी कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणूक लढवावी असे मत जनमानसातून व्यक्त केले जात आहे. परंतु काही व्यक्तिगत कारणांमुळे आम्ही या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी स्पष्टोक्ती मालोजीराजे छत्रपती,  
मधुरिमाराजे छत्रपती यांनी फेसबुक अकाऊंटवरून केली आहे. 

यामध्ये ते म्हणतात, सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक चर्चा घडत आहेत. आमचे कार्यकर्ते व जनतेकडून मधुरिमाराजेंनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी प्रचंड आग्रह होत आहे. कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं प्रेम बघून आम्ही खरंच भारावून गेलो आहोत. खरं पाहता यावेळी निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत पोषक आणि सकारात्मक वातावरण आहे, याची आम्हाला जाणीव आहे. परंतु काही व्यक्तिगत कारणांमुळे आम्ही या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ते पुढे म्हणतात, राजर्षि शाहू महाराजांचे वारस म्हणून आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की जनतेची कामं करण्यात आम्ही उभयतां तसूभरही कमी पडलो नाही आणि पडणार ही नाही. आजही असंख्य व्यक्ती, कार्यकर्ते आमच्याबरोबर अनेक उपक्रमात सक्रिय असतात. यामुळेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आम्ही लक्षणीय काम करू शकलो. त्यामुळे आपल्याकडे सत्ता असेल तरच समाजसेवा करता येईल हा भ्रम आमच्या कोणाच्याही मनात नाही. राजघराण्यातील सर्वच व्यक्तींना करवीरवासीयांनी नेहमीच मान सन्मान दिला आहे. त्यामुळे येथील जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत त्यांच्या सोबत राहणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो, असेही मालोजीराजे व मधुरिमाराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Madhurimaraje comment on election