Vidhan Sabha 2019 : प्रभाकर देशमुखांना आमदार करणारच : डाॅ. दिलीप येळगावकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दहिवडी : निवडणूक आली की पाण्याचं गाजर दाखवणार्या लबाड लांडग्याला त्याची लायकी दाखवायची वेळ आली आहे असा घणाघात करतानाच डाॅ. दिलीप येळगावकर यांनी प्रभाकर देशमुख यांना निवडून आणणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला.

दहिवडी : निवडणूक आली की पाण्याचं गाजर दाखवणार्या लबाड लांडग्याला त्याची लायकी दाखवायची वेळ आली आहे असा घणाघात करतानाच डाॅ. दिलीप येळगावकर यांनी प्रभाकर देशमुख यांना निवडून आणणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला.

बिजवडी (ता. माण) येथे अपक्ष उमेदवार  प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत बिदाल गटातील अनेक गावातील लोकांनी  सक्रिय सहभाग घेतला. यावेळी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. या सभेस अनिल देसाई, डॉ. संदिप पोळ,  काँग्रेसचे तालुका अध्यक्ष एम. के. भोसले, रासपचे मामूशेठ विरकर, नकुसाताई जाधव, पिंटूशेठ जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. येळगावकर म्हणाले, 'मतदारसंघातील वाईट शक्ती बाहेर घालवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आमदारांनी दहा वर्षात काय दिवे लावले. आता या लबाड लांडग्याला त्याची लायकी दाखवायची वेळ आली आहे. निवडणूक आली की पाणी आणल्याचं गाजर दाखवायचं काम सुरु असतं. प्रामाणिकपणे काम केलं आसतं तर चारा छावण्या सुरु करायची वेळ आली नसती. आता ही खरी वेळ आहे प्रभाकर देशमुखांना आमदार करण्याची. आमचा त्यांच्या नेतृत्वावरती पुर्णपणे विश्वास आहे.'

अनिल देसाई म्हणाले, 'माजी आमदार जयकुमार गोरे यांनी आजपर्यंत एकच भुमिका ठेवली, मी नेता बाकी सर्व चोथा.गावगाड्यात यांनी दोन नंबरचा कार्यकर्ता जिंवत ठेवला नाही. यांच्या या त्रासाला  कंटाळून गावागावात विरोधात असलेले कार्यकर्ते एकत्र येऊन आपल्या सोबत आले आहेत. कुकुडवाड गटातून सगळ्यात जास्त लीड मी प्रभाकर देशमुख यांना देणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तर काही फरक पडनार नाही. यावेळी पन्नास हजाराच्या मताधिक्याने गुलाल हा आमचं ठरलंय.'

या वेळी एम. के. भोसले म्हणाले आपल्याला प्रमाणीकपणे प्रभाकर देशमुख यांना मदत करायची आहे. त्यांच्या आजवरच्या सर्व कामाचा लेखाजोखा केला तर आपल्याला या माणसाला का निवडून द्यायचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर यांनी प्रभाकर देशमुख यांना 'आमचं ठरलयं'चे उमेदवार प्रभाकर देशमुख यांना मोठ्या ताकदिने निवडून देण्याचे आवाहन केले. माझ्या पक्षाचा आणि माझ्या धनगर समाजाचं संपूर्ण सहकार्य करणार आहोत. महायुती तोडुन देशमुखांना सहकार्य करण्याचे कारण प्रशासकीय कामाचा अनुभव आणी सुज्ञ नेतृत्व  आम्हाला मान्य आहे. माजी आमदारांच्या अस्ताचे हे दिवस आहेत हि गर्दी सांगत आहे. प्रभाकर देशमुखांचा विजय निश्चित आहे.

विरोधकांच्या आशा आकांक्षा धुळीस मिळवत 'आमचं ठरलंय' टीमने विरोधकांच्या सुप्त इच्छांना सुरुंग लावला. कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी एकजूट कायम तर ठेवलीच पण दिवसागणिक ही टीम वाढवत नेली. त्याचाच परिपाक म्हणून 'आमचं ठरलंय' टीमचे अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना गावागावातून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असून माण मतदारसंघात त्यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे अशी चर्चा मतदारसंघात जोर धरु लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 mann constituency dr. dilip yelgaonkar statement prabhakar deshmukh