जोरदार शक्तिप्रदर्शनाने मंत्री खाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस प्रारंभ झाला. 

मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस प्रारंभ झाला. गणेश तलाव, मंगळवार पेठ, सराफ कट्टा , महाराणा प्रताप चौक या शहरातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक तहसील कार्यालयासमोर आली.  

मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी खाडे यांचे त्यांच्या चाहत्यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी महापौर संगीता खोत, मिरज पंचायत समितीच्या सभापती शालन भोई, उपसभापती विक्रम पाटील, पंचायत समिती सदस्य काकासाहेब धामणे, कृष्णदेव कांबळे, रंगराव थोरात, महापालिका सदस्य गणेश माळी ,पांडुरंग कोरे, दीपक शिंदे उपस्थित होते.

खाडे यांनी पाच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांच्याकडे दाखल केला. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे बजरंग पाटील, रिपब्लिकनचे विवेक कांबळे,  भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांचा समावेश होता.

काँग्रेस कार्यकर्तेही मिरवणूकीत

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीमध्ये सुरेश खाडे यांना नुकताच पाठिंबा दिलेले त्यांचे पारंपरिक विरोधक सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांचेसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Minister Suresh Khade fill form from Miraj