Vidhan Sabha 2019 : 'तुम्ही उन्हात तर, मी पण उन्हात'; रोहित पवारांचा फोटो व्हायरल

टीम ई-सकाळ
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात रोहित पवार स्टेजवर उन्हात बसले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे भाषण करताना दिसत आहेत. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यानंतर रोहित पवार असे का बसले असावेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात रोहित पवार स्टेजवर उन्हात बसले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे भाषण करताना दिसत आहेत. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यानंतर रोहित पवार असे का बसले असावेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्या मागे एक किस्सा आहे. त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

रोहित पवार, धनंजय मुंडे उन्हात
जामखेड शहरातील बाजारतळावर काल रोहित पवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या सभेला उपस्थित होते. सभेची वेळ दुपारी 3 वाजताची होती. त्यात कडक ऊन होते. सभेसाठी आलेली जनता उन्हात बसलेली होती. ज्या वेळी धनंजय मुंडे आणि रोहित पवार स्टेजवर आले. तेव्हा पवार यांनी लोक उन्हात बसलेली पाहिली. त्या वेळी त्यांनी माईकवरून सांगितले की, 'जर तुम्ही उन्हात बसलेले असाल तर मी ही उन्हातच बसणार...', असे म्हणत रोहित पवार स्टेजच्या समोर उन्हात येऊन बसले. त्यावेळी लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पूर्ण सभा संपेपर्यंत रोहित पवार उन्हात बसलेले होते. त्यांच्या बरोबर धनंजय मुंडेही उन्हात बसले होते. रोहित पवार यांच्या उन्हात बसण्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तसेच पवार आणि मुंडे उन्हात बसल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image may contain: 7 people, including Kamble Nikhil

महाराष्ट्रातील निवडणुका आणि कलम 370चा काय संबंध : अजित पवार

काँग्रेस सावरकरांच्या विरोधात नाही : डॉ. मनमोहनसिंग 

उमेदवारी अर्ज भरतानाही उन्हात
दरम्यान, रोहित पवार यांनी रोड शो करून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रोड शोमध्ये समर्थक उन्हातून येत असल्याचे पाहून, त्यावेळी रोहित यांनी 'मी पण तुमच्यासोबत उन्हातून येणार,' असे म्हणत रोहित पवार गाडीच्या टपावर उन्हात बसले होते. संपूर्ण रोडशो दरम्यान रोहित गाडीच्या टपावर होते. त्याची ही सोशल मीडियावर चर्चा झाली होती. त्यानंतर आज, त्यांच्या जामखेडमधील सभेच उन्हात बसल्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 ncp leader Rohit Pawar photo gets viral on social media