Vidhan Sabha 2019 : पवार म्हणतात, '370 रद्द केलं आनंद आहे, 371 लक्षात ठेवा'

vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar comment on article 370 solapur barshi
vidhan sabha 2019 ncp leader sharad pawar comment on article 370 solapur barshi

बार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं.  पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी कलम 371ची अमित शहा यांना आठवण करून दिली.

बार्शीतून काश्मीरात शेती करायला जाणार?
शरद पवार यांनी कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा देताना त्या निर्णयाची खिल्लीही उडवली आहे. पवार म्हणाले, '370 कलमामुळे तुम्हाला आम्हाला कोणालाही जम्मू-काश्मीरमध्येजमीन घेता येत नव्हती. पण, आता कलम रद्द झालं असलं तरी, बार्शीतून कोण काश्मीरमध्ये जमीन घ्यायला जाणार आहे.? तुम्ही बार्शी सोडून काश्मीरमध्ये शेती करायला जाणार? इथं सोलापुरात येऊन अमित शहा विचारणा करतात शरद पवारसाहब जवाब दो. आता जवाब काय द्यायचा? दिला आम्ही पाठिंबा कलम 370 रद्द करण्याला. आनंद आहे.'

371ला काय झालं?
पवार म्हणाले, '370 प्रमाणं 371 हेही एक कलम आहे. त्यात ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड, मेघालय अशी नऊ राज्यं येतात. 371नुसार तिथंही आपल्याला जमीन घेण्याचा अधिकार नाही. काश्मीरमधलं कलम हटवलं आणि त्या नऊ राज्यांमधलं तुम्हाला हटवता येत नाही?'

दिवसरात्र फक्त 370
दरम्यान, 370 कलम रद्द केल्याच्या निर्णयाचा भडीमार केल्यावरही शरद पवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'सध्या काहीही झालं तरी, 370 कलमाचं तुणतुणं वाजवलं जातंय. काही झालं तरी, म्हणजे, लोकांनी विचारलं बेकारी आहे 370, शेतीमालाला दर नाही 370, गावाचा विकास झाला नाही 370, आया बहिणींवर अत्याचार होतोय 370,सकाळपासून संध्याकाळपर्यंत 370? मला तर आता यांची काळजी वाटू लागली आहे. हे झोपेतही म्हणत असतील 370 आणि घरातले विचारत असतील. हे काय झालंय? '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com