Vidhan Sabha 2019 : प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाच्या केवळ अफवाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी - भाजपमधील प्रवेशाबाबत प्रकाश आवाडे यांच्याकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. याबाबत माझ्या नावाचा वापर केला जात आहे. या संदर्भात आपली व आवाडे यांची कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे आज दिले.

येथील अग्रसेन भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा व जाहीर प्रवेश कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. श्री. आवाडे निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर श्री. पाटील यांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली.

दरम्यान, याप्रसंगी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पै. अमृत भोसले, नगरसेवक अमरजित जाधव, उद्योजक जीवन बरगे, आशीष मालू, जीवन बरगे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील म्हणाले, ""आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरासाठी पाच वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून निधी आणला आहे. सत्तेत पुन्हा भाजप - शिवसेना सरकार येणार आहे. आम्ही झोपेत दिलेली आश्‍वासने पाळतो. त्यामुळे यंत्रमागधारकांच्या वीज बिलाचा प्रश्‍न शब्द दिल्याप्रमाणे मार्गी लावला जाईल.'' 

आमदार हाळवणकर म्हणाले, ""आतापर्यंत आपण फक्त विकासाचे राजकारण केले. पण गावात बुद्धिभेद करण्याचे काम काही मंडळींकडून सुरू आहे. पण कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहण्याचे कारण नाही. आपला विजय निश्‍चित आहे.'' 

कामगार नेते मिश्रीलाल जाजू, ऋषभ जैन, वैशाली नायकवडे यांची भाषणे झाली. रामदास कोळी यांनी सूत्रसंचालन केले. सचिन हुक्कीरे यांनी आभार मानले. 

व्यासपीठावर उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सतीश डाळ्या, अशोक स्वामी, अजितमामा जाधव, रवी रजपुते, प्रकाश पुजारी, अमित गाट, महेश बोहरा, रवी लोहार, उदय बुगड, धोंडिराम जावळे, विजया पाटील आदी उपस्थित होते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Only rumors of Prakash Awade entry in BJP