Vidhan Sabha 2019 : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रकाश आबिटकर म्हणाले,...

Vidhan Sabha 2019 : उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रकाश आबिटकर म्हणाले,...

राधानगरी - राधानगरी विधानसभा मतदारसंघातील रेंगाळलेला विकास मार्गी लावण्यासाठी मला मिळालेली पाच वर्षे तोकडी पडली आहेत. तरीही पैशासाठी नव्हेतर माणसांसाठी मी माझी सत्ता पणाला लावली म्हणूनच गावंच्या गाव उत्स्फूर्तपणे माझ्यामागे आहेत, हे आज अर्ज भरण्यासाठी आलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या पाठिंब्यावरुन लक्षात येते. गरीब जनतेचे प्रेमच मला जिंकून देईल. मतदारसंघातील एकही गाव नाही जिथे विकास पोहोचवला नाही' जिथे मी काम केलं नाही त्याच शिदोरीवर माझा विजय निश्‍चित आहे. असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गारगोटीहून मुदाळतिट्टा, बिद्री' भोगावती' घोटवडे, गुडाळ या मार्गावरून आलेल्या महारॅलीची येथे सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

रॅलीमध्ये सहभागी झालेले लोक, त्यांच्या डोक्‍यावर भगव्या टोप्या' हातात भगवे झेंडे आणि भगवे स्कार्फ यामुळे सबंध बाजारपेठ भगवी झाली होती. हा जनाधार आणि हा उत्स्फूर्त पाठिंबा हीच मी गेल्या पाच वर्षात मिळवलेली कमाई आहे, असे सांगून श्री. आबीटकर म्हणाले "या मतदारसंघात 265 कोटी नव्हेतर 2065 कोटी जरी मिळाले तरी अपुरे पडतील असा प्रचंड मतदारसंघ विखुरला आहे. तरीही येथील प्रत्येक गावात विकास पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. मला जनतेने मोठ्या पाठिंब्यावर निवडून दिले होते ते सार्थ करण्यासाठी अहोरात्र झटलो. विधानसभा गाजवणारा आमदार आणि हक्काने कामे ओढून आणणारा आमदार म्हणून लोक माझी स्तुती करतात तेच याच कामाच्या जोरावर. मतदारसंघातील महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले. रस्त्याचे जाळे विणले, अनेक गावांमध्ये छोटी-मोठी काम दिली. याची जाण इथल्या जनतेला आहे म्हणूनच आजच्या रॅलीत नव्या मतदारा पासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झाले. महिलाही उत्स्फूर्त आल्या हे मला मिळालेले पाठबळ हीच विजयाची नांदी ठरेल.'' 

मारुतराव जाधव तळाशीकर यांनी या मतदारसंघात केलेला विकास हाच विरोधकांना खूप तो आहे. असे सांगून आमदारांना "आबीटकर न म्हणता रोडकर' म्हणावे लागेल इतके रस्ते यांनी विणली आहेत असेही सांगितले. यावेळी बाळासाहेब कांबळे यांचेही भाषण झाले. रॅलीमध्ये प्रचंड संख्येने लोक सहभागी झाले होते. 

आजरा मुस्लिम संघटनेनेही आमदार प्रकाश आबीटकर यांना पाठिंबा व्यक्त केला आणि व्यासपीठावर येऊन त्यांना आलिंगन दिले. त्याबरोबरच अनेक युवक संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केला. यावेळी नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील यांच्यासह तमाम शिवसैनिक उपस्थित होते. 

रॅलीद्वारे दबदबा 
आमदार आबीटकर यांनी रॅली काढली. गारगोटीतून भोगावती "खिंडी व्हरवडे' गुडाळमार्गे राधानगरीपर्यंत आली. तत्पूर्वी श्री. आबिटकर यांनी सकाळी निवडणूक अधिकारी संपत खिलारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मोजकेच कार्यकर्ते होते. दुपारी चार वाजता शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी भुदरगड आणि राधानगरी तालुक्‍यात दबदबा निर्माण केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com