esakal | Vidhan Sabha 2019 : आटपाडीत पावसामुळे मतदानासाठी नागरिकांना करावी लागतेय कसरत
sakal

बोलून बातमी शोधा

Voters face problems due to Heavy rains in Atpadi Taluka

आटपाडी - गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर आहे. या पावसाने तालुक्यातील ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. जवळपास डझनभर पुल पाण्याखाली गेले आहेत. अठरा वर्षानंतर  पुल पाण्याखाली गेले आहेत.

Vidhan Sabha 2019 : आटपाडीत पावसामुळे मतदानासाठी नागरिकांना करावी लागतेय कसरत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आटपाडी - गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर आहे. या पावसाने तालुक्यातील ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. जवळपास डझनभर पुल पाण्याखाली गेले आहेत. अठरा वर्षानंतर पुल पाण्याखाली गेले आहेत. आज मतदान असल्यामुळे आवळाई, शेटफळे आणी माळेवाडी येथे मतदानासाठी जाताना नागरिकांना मात्र कसरत करावी लागत आहे. वयोवृध्दानाही विशेष दक्षता घेऊन आणले जात होते. पाण्यातून मार्ग काढून अनेकांनी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे.           

सांगलीत पुन्हा पूरसदृश परिस्थिती; नागरिकांचे स्थलांतर सुरु 

यावषीॅ आटपाडी तालुक्यात सरासरी 525 मीमी पाऊस पडला आहे. बहुतांश ओढे- नाले पंधरा दिवसापासून वाहू लागले आहेत. काल दिवसभर पावसाच्या सरी थोड्या थोड्या विश्रांतीने कोसळत होत्या. या पावसामुळे गोमेवाडी - करगणी - शेटफळेचा ओढा दुथडी भरून वाहू लागला आहे.

Vidhan Sabha 2019 : पावसामुळे कोल्हापुरात सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी

आटपाडी ओढ्यासही पाणी वाढले आहे. खरसुंडी भागातीलही ओढयाचे पाणी वाढले आहे. शेटफळे येथील दोन्ही पुलावरून पाणी वाहू लागले आहे. माळेवाडी, आवळाई, करगणी - शेटफळे, करगणी - माळेवाडी, करगणी - तळेवाडी या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. तळेवाडी गावालगतचा पुल वाहून गेला आहे. गोमावाडी, हिवतड येथीलही पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

Vidhan Sabha 2019 : मतदानानंतर संभाजी भिडे यांनी मतदारांना केले हे आवाहन... 

शिराळा तालुक्यात सर्वाधिक 67.8 मि.मी. पाऊस

दरम्यान, सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 46.10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 67.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या चोविस तासात तालुक्यात झालेला पाऊस 

कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी अशी - (कंसात एक जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी.मध्ये) 

मिरज 31 (766.2), जत 31.8 (438.1), खानापूर-विटा 39.4 (692), वाळवा - इस्लामपूर 51.5 (946.9), तासगाव  48.5 (667.8), शिराळा  67.8 (2072.2), आटपाडी  54.3 (578.8), कवठेमहांकाळ 41 (607.7), पलूस 53.5 (676.8) व कडेगाव 50 (1023.4).