रणजित, अनिल, संदीप त्रिकुटाचा प्रभाकर देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार

टीम ई-सकाळ
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

माण : माण विधानसभा मतदारसंघाच्या मैदानातील 'आमचं ठरलंय' टीम मधील उमेदवारीचे प्रबळ दावेदार रणजित देशमुख, अनिल देसाई व संदीप मांडवे या त्रिकुटाने 'आमचं ठरलंय' टीमसाठी उमेदवारीचा त्याग करुन माजी आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्याचा व प्रभाकर देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

वडूज येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करून 'आमचं ठरलंय' टीममधील उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या आपल्या उरावर बसलेलं बांडगूळ आज हद्दपार झालं आहे, असा टोला रणजित देशमुख यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला. तसेच 'आमचं ठरलंय'च्या आजच्या बैठकीने ऐतिहासिक विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. खोटं बोल पण, रेटून बोल यात विरोधक वाकबगार आहेत. त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये. मी पायाभरणी केलेल्या औद्योगिक क्षेत्राला प्रभाकर देशमुख हे आपल्या कल्पकतेने उभारी देतील.’

अनिल देसाई म्हणाले, ‘विचारांचं राजकारण सुरु व्हावं म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी आमचं ठरलंयचं भूमिका मांडली. ठरलंय हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे टूटेगा नही. तर, ‘सामनेवाले को तोडनेवाला है’. उद्दिष्टापासून बाजूला जायचं नाही ही भूमिका आम्ही ठेवली आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख हे एकटे उमेदवार नसून, आम्ही सगळे उमेदवार आहोत, असं समजून काम करणार आहोत.’ संदीप मांडवे म्हणाले ‘अनुभवाने व वयाने जेष्ठ असलेल्या प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी माण-खटावमध्ये परिवर्तन करणारी आहे. त्यांची उमेदवारी ही ऐतिहासिक विजयाची नांदी आहे.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 satara man khatav prabhakar deshmukh getting local leaders support