Vidhan Sabha 2019 : म्हणून 'या' गावातील सातशे मतदार राहिले मतदानापासून वंचित (Video)

प्रशांत देशपांडे
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती गावातील बेघर वस्तीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. येथील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे 750 मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत. 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे बेघर वस्तीतील सुमारे 750 मतदारांना सोमवारी (ता.21) मतदानापासून वंचित राहावे लागले. याचा फटका तालुक्यातील मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात रविवारी रात्री 77 मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्वच ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. दक्षिण सोलापूरमधील मुस्तीमध्येही मुसळधार पाऊस झाला.

- Video : लोककला संवर्धनासाठी बिरोबा बनात गजनृत्याचे चित्रीकरण

विधानसभेसाठी सोमवारी सर्वत्र मतदान झाले. मात्र, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मुस्ती गावातील बेघर वस्तीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. येथील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे 750 मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत. तर भामाला तांड्यावरून मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना परतणे अवघड झाले होते. त्यामुळे हरणा नदीवर लवकरात लवकर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

- Vidhan Sabha 2019 : मतदानासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा!

बेघर वस्तीची लोकसंख्या 1500 च्या घरात आहे. या वस्ती मधील नागरिकांचा पावसाळ्यातील चार महिने जगाशी संपर्क तुटतो. पलीकडून बोरी नदी वाहत असल्यामुळे या वस्तीला चार महिने पाण्याचा वेढा असतो. 
- महादेव पाटील, उपसरपंच 
 
पावसाळ्यात या नदीला पूर आल्यावर गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावातील लहान मुलांना शाळेला यायला जायला अवघड होते. त्यामुळे शासनाने हरणा नदीवर लवकरात लवकर पूल बांधून द्यावा. आज नाईलाजाने येथील नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. 
- गुंडुपाशा मुजावर, माजी उपसरपंच 
 
हरणा नदीला आलेल्या पुरामुळे वृद्ध मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. युवकांनी चार किलोमीटर लांबून येऊन मतदान केले आहे. मात्र, भालामा तांडा येथून येणाऱ्या अधिकांऱ्यांना गावात येणे अवघड झाले होते. त्याठिकाणी कोणतीही वाहन जात नसल्याने त्या अधिकाऱ्यांना मशीन हातात घेऊन यावे लागले. 
- सैफन तांबोळी 

- Vidhan Sabha 2019 : मुंबई, पुण्यापेक्षा ‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Seven hundred voters deprived from voting