Vidhan Sabha 2019 : शिवसेनेचे अनिल बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

विटा - खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  

आज बाबर यांनी येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, सुहास बाबर, आटपाडीचे तानाजी पाटील, आण्णासो पत्की,  विजय सपकाळ, मिलींद कदम, शंकर मोहिते, अनिल म. बाबर, रमेश शितोळे, अॅड. विनोद गोसावी, महावीर शिंदे, बाळासाहेब लकडे, विनोद गुळवणी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Shiv Sena Anil Babar has filed his nomination