Vidhan Sabha 2019 : उमेदवारी अर्ज भरताना सुधीर गाडगीळ म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सांगली - भाजपचे सांगली मतदार संघातील विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज आज कोणतेही मोठे शक्तीप्रदर्शन न करता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने दाखल केला.

सांगली - भाजपचे सांगली मतदार संघातील विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी उमेदवारी अर्ज आज कोणतेही मोठे शक्तीप्रदर्शन न करता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साधेपणाने दाखल केला.

गेल्या पाच वर्षात मी विकास कामे केली आहेत. मतदार संघाचा आणखी विकास करायचा आहे. याच मुद्यावर मी जनतेसमोर जाणार असल्याचे ते म्हणाले. सांगली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुधीर
गाडगीळ यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आणि नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, महापौर संगीता खोत, मतदार संघाचे प्रभारी दिपक शिंदे, जिल्हा सरचिटणीस अरविंद तांबवेकर, दिलीप सुर्यवंशी, शिवसेनेचे दिगंबर शिंदे, रावसाहेब खोचगे, शंभोराज काटकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

मिरज रोडवरील आमदार कार्यालयासमोर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकराच्या सुमारास उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रमुख नेते आणि शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sudhir Gadgil fill form From Sangli