Vidhan Sabha 2019 : तासगावमधून सुमनताई पाटील यांचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

तासगाव - शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस चे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

आर. आर. पाटील प्रत्येक वेळी अर्ज दाखल करत असताना मोठे शक्तीप्रदर्शन करत असत. तीच परंपरा कायम ठेवत आज सकाळी अकरा वाजता बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयातुन पदयात्रा निघाली. पदयात्रेमध्ये सुमनताई पाटील, अनिताताई सगरे, स्मिता पाटील यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

आम्ही साहेबांबरोबर असे लिहिलेल्या टोप्या पदयात्रेत सर्वांचेच लक्ष वेधत होत्या. तासगाव सांगली रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमध्ये पदयात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले. सभेत रोहित पाटील, अनिता सगरे, आमदार मोहन कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, प्रतीक पाटील यांची भाषणे झाली. त्यानंतर सुमनताई पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sumantai Patil fill form from Tasgaon