Vidhan Sabha 2019 : मतदान केल्याचे सेल्फी, डीपी सजले 

Selfie point in Jaysingpur
Selfie point in Jaysingpur

कोल्हापूर - मतदान केल्याचा नारा सोशल मीडियावर आज चांगलाच घुमला. व्हॉटसऍपचे डीपी, स्टेट्‌स व इन्स्टाग्राम मतदान केल्याच्या फोटोंनी सजले. फेसबुकवर मतदान केल्याची छायाचित्रे दिवसभर अपलोड होत राहिली. सण, उत्सव, घरगुती कार्यक्रम असो की, वाढदिवसाचे सोहळे. सेल्फीची हौस पुरविल्याशिवाय ते साजरे होत नाहीत.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मतदारांनी मतदान केल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकवली. विधानसभा निवडणुकीत त्याची री ओढली. मतदान केल्यानंतर मोबाईल्याच्या कॅमेऱ्याद्वारे वैयक्तिक, मित्रांसमवेत अथवा कुटुंबासह एकत्रित सेल्फी घेऊन तो व्हॉट्‌सऍपच्या डीपी व स्टेट्‌सला सजविला गेला.

फेसबुकवरही फोटो काढताच अपलोड करण्यात आले. व्होट फॉर डेमॉक्रसी, मी मतदान केले तुम्हीही करा, असे आवाहन करत मतदानाला जाताना मेंदूबरोबर घेऊन जा, असा डोसही फेसबुकवरून पाजला. ज्याने गावातील मतदान केंद्रावर पहिल्यांदा मतदान केले, त्यानेही तशी माहिती फेसबुकवर शेअर केली. मतदान केल्यानंतर आपापल्या नेत्यांची छायाचित्रे फेसबुकर झळकविण्यात कार्यकर्ते विसरले नाहीत. युवकांनी ग्रुपची सेल्फी घेण्यास पसंती दिली. फेसबुकवर राज्यातील नेत्यांच्या मतदानाचे व्हिडिओ शेअर केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com