Vidhansabha2019 : पिपल्स रिपब्लिकनला आघाडीकडून हव्यात 'या' जागा

Vidhansabha2019 : पिपल्स रिपब्लिकनला आघाडीकडून हव्यात 'या' जागा

कोल्हापूर -""काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून पिपल्स रिपब्लिकनला राज्यात 11 जागा हव्या आहेत. यात कोल्हापूर हातकणंगले, मिरज, जत या जागांचाही समावेश असेल. या जागा दिल्या नाहीतर स्वबळावर लढणार असल्याचे पिपल्स रिपब्लिकनचे राष्ट्रीय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. 

श्री. कवाडे म्हणाले,  ""आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयातर्फे ऑगस्टमध्ये नाशिकला राज्यव्यापी मेळावा घेणार आहोत." 

प्रा. कवाडे म्हणाले, "देशात जातीयवादी शक्ती पुढे येत आहेत. भाजपचे नियंत्रण आरएसएसकडून होत आहे. त्यातून झुंडशाही पुढे आली आहे. दलित, भटके विमुक्त, अल्पसंख्याकावरील हल्ले वाढत आहे. त्यामुळे दुर्बल घटकात भीतीचे वातावरण आहे. अशी भीती किमान राज्यातून तरी दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी दिलेल्या घटनेचाच आधार घ्यावा लागेल. त्यासाठी लोकशाही बळकट करण्याचा आग्रह धरणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याचाच प्रयत्न म्हणून पिपल्स रिपब्लिकनतर्फे राज्यव्यापी ऐक्‍यासाठी मेळावा घेणार आहोत. 

मेळाव्यासाठी रिपब्लिकनच्या विविध गटांना तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. सर्वजण एकत्र येऊन जातीयवादी शक्ती विरोधात ताकद उभी करण्यासंदर्भात चर्चा करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडला काही ठिकाणी चागंली, तर काही ठिकाणी कमी मते मिळाली. मात्र, ती आघाडी भाजपची "बी टिम' आहे, असे सरसकट आम्ही म्हणणार नाही; पण प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत रहावे. ते आमच्यासोबत आले तर ठिक;अन्यथा रिपब्लिकनच्या गटाना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यासाठी ऐक्‍याची तयारी सुरू केली आहे.'' यावेळी जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर , विभाग अध्यक्ष नंदकुमार गोंधळी उपस्थित होते. 

तुमची मुले सक्षम का नाहीत? 
भाजपमधील पक्षाप्रवेशासंदर्भात स्वतःची मुले संभाळत आली नाहीत म्हणून ते भाजपमध्ये येत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. हा संदर्भ देत प्रा. कवाडे म्हणाले, "दुसऱ्याला मुले सांभाळता येत नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्यांची मुले दत्तक घेणार आहात काय? दुसऱ्यांची मुले आयात करणार का ? तसे करणार असाल तर तुमच्या पक्षातील मुले सक्षम का नाहीत हेही पहावे लागेल. त्यामुळे भाजपचे हे दत्तकविधान लोकशाहीला अभिप्रेत नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com