Vidhansabha 2019 : मधुरिमाराजेंचा निर्णय गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्‍यता नसल्याचे संकेत मिळत आहेत. राजघराण्यातील अन्य कोणतीही व्यक्ती विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असेही समजते.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्‍यता नसल्याचे संकेत मिळत आहेत. राजघराण्यातील अन्य कोणतीही व्यक्ती विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असेही समजते.

ऋतुराज पाटील यांची कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून उमेदवारी देऊन लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या जागी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू होते. त्यांनी लढावे, असा वरिष्ठ पातळीवरून आग्रह होता. 

मधुरिमाराजे यांनी दोन वर्षांपूर्वी अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांचे लक्ष्य विधानसभा २०१९ चे असेल, अशी शक्‍यता होती. ऋतुराज यांचा दक्षिणमधून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर काँग्रेसकडून मधुरिमाराजेंचेच नाव प्रामुख्याने उत्तरमधून चर्चेत आले. शहराच्या जुन्या भागात राजघराण्याविषयी आदर आहे.

मालोजीराजे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत २८ हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत मधुरिमाराजे यांनी जोरदार प्रचार केला होता. त्या निवडणुकीपासून त्यांची संभाव्य उमेदवार, अशी गणना होऊ लागली. २०१४ ला मालोजीराजे यांनी न लढण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी नगरसेवक सत्यजित कदम यांना मिळाली. संभाजीराजे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. 

मधुरिमा यांनी विधानसभा लढविल्यास पुन्हा एकदा निवडणूक चुरशीची होईल, अशी चिन्हे होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी मधुरिमाराजे आणि ऋतुराज पाटील हेच खरे प्रतिस्पर्धी होते. गेल्यावेळी राजघराण्यातील कुणी निवडणूक लढविली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 Madhurimaraje will not contest