Vidhansabah2019 : सांगलीत 23.75 लाख मतदार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

सांगली - ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 हजार 405 मतदार केंद्रांत मतदान होईल. पुरुष 12 लाख 21 हजार 213, तर महिला 11 लाख 53 हजार 86, इतर 75 इतर असे 23 लाख 74 हजार 374 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली - ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2 हजार 405 मतदार केंद्रांत मतदान होईल. पुरुष 12 लाख 21 हजार 213, तर महिला 11 लाख 53 हजार 86, इतर 75 इतर असे 23 लाख 74 हजार 374 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी 23 लाख 63 हजार 128 मतदार होते. नवमतदारांत 12 हजार 246 नी मतदार संख्या वाढली. 

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार - मिरज- 296 भाग, 1 लाख 66 हजार 976 पुरुष, 1 लाख 58 हजार 453 स्त्रीया, 16 इतर. एकूण - 3 लाख 25 हजार 445; सांगली - 296 भाग, 1 लाख 64 हजार 528 पुरुष, 1 लाख 59 हजार 85 स्त्रीया व 33 इतर. एकूण - 3 लाख 23 हजार 646; इस्लामपूर- 284 भाग - 1 लाख 38 हजार 163 पुरुष, 1 लाख 32 हजार 410 स्त्रीया. एकूण -2 लाख 70 हजार 573; शिराळा- 334 भाग, 1 लाख 49 हजार 607 पुरुष, 1 लाख 41 हजार 605 स्त्रीया व 1 इतर. एकूण - 2 लाख 91 हजार 213; पलूस-कडेगाव - 283 भाग, 1 लाख 40 हजार 27 पुरुष, 1 लाख 37 हजार 561 स्त्रिया व 5 इतर. एकूण - 2 लाख 77 हजार 593. खानापूर- 341 भाग, 1 लाख 66 हजार 586 पुरूष, 1 लाख 55 हजार 585 स्त्रीया व 8 इतर. एकूण - 3 लाख 22 हजार 179. तासगाव-कवठेमहांकाळ- 291 भाग, 1 लाख 50 हजार 747 पुरूष, 1 लाख 41 हजार 921 स्त्रीया व 6 इतर. एकूण - 2 लाख 92 हजार 674; जत- 280 भाग, 1 लाख 44 हजार 579 पुरुष, 1 लाख 26 हजार 466 स्त्रीया, 6 इतर. एकूण - 2 लाख 71 हजार 51. 
 

यादीत नावाची खात्री करा 

निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2019 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घेतला होता. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात जिल्हा, तालुका, अन्य शासकीय ठिकाणी मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.  मतदार यादीत सर्वांनी आपली नावे आहेत काय हे तपासून पहावे. ज्यांची नावे समाविष्ठ झालेली नाहीत त्यांनी मतदार नोंदणीचा परिपूर्ण अर्ज सर्व तहसिलदार कार्यालय व सांगली मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे आवश्‍ययक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha 2019 in Sangli 23.75 lakh voters